IND vs PAK: पाकिस्तान विरुद्धाच्या सामन्यात रोहितचा फ्लॉप शो; ट्विटर वापरकर्त्यांची हिटमॅनवर जोरदार फटकेबाजी

आज टी20 विश्वचषकातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्धात होत आहे. भारत-पाकिस्तानचा सामना म्हटला म्हणजे प्रेक्षकांमध्ये आणि क्रिकेट वेड्यांमध्ये मोठा जोश पाहण्यास मिळतो.

Rohit's flop show in the match against Pakistan
IND vs PAK: पाकिस्तान विरुद्धाच्या सामन्यात रोहितचा फ्लॉप शो  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली : आज टी20 विश्वचषकातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्धात होत आहे. भारत-पाकिस्तानचा सामना म्हटला म्हणजे प्रेक्षकांमध्ये आणि क्रिकेटवेड्यांमध्ये मोठा जोश पाहण्यास मिळतो. दोन्ही देशातील खेळाडूंवर चाहत्यांच्या अपेक्षांचा दबाव असतो. जर कोणत्या खेळाडूने आपला फ्लॉप शो दाखवला तर त्याला चाहत्याच्या रोषाला सामोरे जावे लागते.

आज भारत आणि पाकिस्तानचा सामना चालू आहे, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलदांजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा हा निर्णय काहीसा प्रमाणात योग्य ठरला आहे. कारण भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत.

हिटमॅन रोहित शर्मा आणि केएल राहुल दोघांनी खराब खेळ केला आहे. यावर भारतीय क्रिकेट प्रेमी संतापले असून ट्विटरवर रोहितवर जोरदार टीकेची फटकेबाजी सुरू केली आहे.

पाकिस्तानच्या जलद गतीचा गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदीने टीम इंडियाचे स्टार सलामीवीर रोहित शर्माला बाद केलं. रोहित बाद झाल्याने चाहते संताप व्यक्त करत आहेत. 

भारतीय चाहते रोहित शर्मावर चिडले

पाकिस्तानच्या आफ्रिदीने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्माला बाद केले. रोहितने आपले खातेही उघडले नव्हते. या मोठ्या सामन्यात रोहित फ्लॉप झाल्याने भारतीय चाहते चांगलेच संतापलेले दिसले. चाहते सोशल मीडियावर रोहितबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. रोहितबद्दलचे अनेक मीम्सही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

केएल राहुलही झाला फ्लॉप 

रोहित शर्मा व्यतिरिक्त केएल राहुलही पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप ठरला. शाहीन आफ्रिदीनेही त्याची शिकार केली. राहुल 3 धावा केल्या असताना शाहीन गोलंदाजीला आला. या दोन्ही खेळाडूंकडून टीम इंडियाला खूप आशा होत्या. मात्र हे दोन्ही खेळाडू मोठ्या प्रसंगी फ्लॉप ठरले.  यासह भारताच्या मोठी धावसंख्या करण्याच्या आशाही भंगू शकतात. 

गोल्डन डकवर  आधीही फलंदाज झाले आहेत आउट 

भारताकडून शून्यावर बाद होणारा रोहित शर्मा पहिला क्रिकेटपटू नाही. याआधीही अनेकजण शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. रोहित व्यतिरिक्त ईशांत शर्मा, सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणे हे देखील गोल्डन डकवर बाद झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी