मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी कसोटी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांना फायदा झाला आहे. तर जसप्रीत बुमराहला गोलंदाजीत नुकसान सोसावे लागले आहे.
अधिक वाचा :
Team india: द. आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियाला दोन मोठे झटके
फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल-10 मध्ये फक्त दोन भारतीय आहेत. रोहित शर्मा 8 व्या तर विराट कोहली 10 व्या क्रमांकावर आहे. तर जो रूटला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबर आझमनेही एका स्थानाने झेप घेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. विल्यमसन आता पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. तर ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लॅबुशेनने अव्वल स्थान पटकावले आहे. लॅबुशेनचे ८९२ गुण आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रूटचे ८८२ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचीही तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्याला रूटने मागे टाकले आहे. याशिवाय टॉप-10 मध्ये कोणतीही हालचाल झाली नाही.
अधिक वाचा :
ICC Test Ranking: ICC क्रमवारीत जो रूटने घेतली मोठी झेप; विराट कोहलीच्या अडचणीत वाढ
त्याचबरोबर गोलंदाजांच्या टॉप-10 रँकिंगमध्ये दोन भारतीय आहेत. यामध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ८५० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. बुमराह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमसनने दोन स्थानांची झेप घेतली आहे. जेमसन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अधिक वाचा :
IND vs SA: टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतच असणार बॉस; पाहा आकडे
ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचे 901 गुण आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही टॉप-10 मध्ये आहे, त्याला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.