Ross Taylor: शेवटची कसोटी...शेवटचा बॉल आणि शेवटची विकेट...केले जबरदस्त सेलिब्रेशन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 11, 2022 | 17:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ross Taylor Last Wicket: बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात ख्राईस्टचर्चमध्ये खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना रॉस टेलरच्या करिअरचा शेवटचा सामना होता. कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी जेव्हा बांगलादेशच्या नऊ विकेट गेल्या तेव्हा रॉस टेलरच्या हाती बॉल आला आणि यासोबतच इतिहास रचला गेला. 

ross taylor
शेवटची कसोटी...शेवटचा बॉल आणि शेवटची विकेट...केले सेलिब्रेशन 
थोडं पण कामाचं
  • रॉस टेलर खेळला आपला शेवटचा कसोटी सामना
  • न्यूझीलंडने बांगलादेशला हरवले

मुंबई: एखाद्या क्रिकेटरसाठी आप्या करिअराला अलविदा म्हणताना तो क्षण अतिशय आनंदपूर्ण झाला पाहिजे असे वाटते. आपल्या शेवटच्या सामन्यात आपल्यामुळे विजय मिळावा असे प्रत्येक खेळाडूला वाटते. मात्र प्रत्येकाच्याच नशीबात तसे नसते. मात्र न्यूझीलंडच्या(new zealand ross taylor) रॉस टेलरसोबत हे घडले. बांगलादेशविरुद्धच्ा(new zealand vs bangladesh) सामन्यात रॉस टेलरने बॉलिंग केली आणि आपल्या करिअरमधील शेवटच्या बॉलवर विकेटही घेतली. 

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात ख्राईस्टचर्चमध्ये खेळवल्या जात असलेल्या दुसऱा कसोटी सामना रॉस टेलरच्या करिअरमधील शेवटचा सामना होता. कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी बांगलादेशच्या नऊ विकेट पडल्या होत्या. तेव्हा रॉस टेलरच्या हातात बॉल आला. यासोबतच इतिहास रचला गेला. 

रॉस टेलरच्या बॉलवर बांगलादेशचा इबादत हुसैनने हवेत शॉट खेळला. बॉल सरळ न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमच्या हाती गेला आणि इबादत हुसैन बाद झाला. रॉस टेलरने आपल्या कसोटी करिअरमधील शेवटच्या बॉलवर विकेट घेतला. हा त्याच्या करिअरमधील तिसरा विकेट आहे. 

बांगलादेशला हरवल्यानंतर न्यूझीलंडचा संघ आता १-१ अशा बरोबरीत आहे. गेल्या सामन्यात बांगलादेशने चमत्कार केला होता आणि न्यूझीलंडच्या त्यांच्याच मैदानावर मात दिली होती. रॉस टेलरने मालिका सुरू होण्याआधीच सांगितले होते की हा त्याचा करिअरमधील शेवटचा कसोटी सामना असणार आहे. 

रॉस टेलरचे करिअरमधील ३ विकेट

  1. हरभजन सिंग
  2. एस. श्रीसंत
  3. इबादत हुसैन

रॉस टेलरची गणना न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. न्यूझीलंडसाठी एकूण १११ कसोटी सामने खेळणाऱ्या रॉस टेलरने ४४.७६च्या सरासरीने ७६५५ धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये ४९च्या सरासरीने ८५८१ धावा केल्या आहेत. रॉस टेलरने २००६मध्ये आपले पदार्पण केले होते. तब्बल १५ वर्षांच्या करिअरचा अंत झाला आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी