Ruturaj Gaikwad: या क्रिकेरटरमुळे ऋतुराजने 1 ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्स...खोलले गुपित

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 29, 2022 | 12:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना स्पिनर शिवा सिंहच्या एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले. ऋतुराज आता धोनीबाबत एक मोठे विधान केले आहे. 

ruturaj gaikwad
या क्रिकेरटरमुळे ऋतुराजने 1 ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्स.. 
थोडं पण कामाचं
  • भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राशी बोलताना ऋतुराज गायकवाडने धोनीसोबतच्या आठवणी सांगितल्या.
  • महेंद्रसिंग धोनीच्या शांत स्वभावाने ऋतुराज गायकवाड प्रभावित झाला होता.
  • ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमधील सामन्यात 159 बॉलमध्ये नाबाद 220 धावांची खेळी केली.

मुंबई: ऋतुराज गायकवाड(ruturaj gaikwad) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये(vijay hazare trophy) स्पिनर शिवा सिंहच्या(spinner shiva singh) एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले. आता ऋतुराज गायकवाडने महेंद्रसिंग धोनीबाबत(ms dhoni) मोठे विधान केले आहे. ऋतुराजने धोनीकडून एक चांगली गोष्ट शिकली आहे. जाणून घेऊया त्या बद्दल...Ruturaj gaikwad says about Ms Dhoni

अधिक वाचा - मुंबईतील बड्या नेत्याने सोडले ठाकरेंचे शिवबंधन

ऋतुराज गायकवाडने केले हे विधान

ऋतुराज गायकवाडचे म्हणणे आहे जेव्हा संघ खराब काळातून जात असेल तेव्हा महेंद्रसिंग धोनी त्याच पद्धतीचे आचरण ठेवतो. जेव्हा सीएसकेने नवा कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात आयपीएल 2022मध्ये खराब सुरूवात केली होती त्याचवेळी धोनीला स्पर्धेच्या मध्येच कर्णधार बनवण्यात आले होते. 

संघाचे वातावरण असते समान

भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राशी बोलताना ऋतुराज गायकवाडने धोनीसोबतच्या आठवणी सांगितल्या. महेंद्रसिंग धोनीच्या शांत स्वभावाने ऋतुराज गायकवाड प्रभावित झाला होता. गायकवाड याबाबत बोलताना म्हणाला, विजय असो वा पराजय, संघाचे वातावरण बिघडता कामा नये याची काळजी धोनी नेहमी घेतो. निश्चितपणे सततच्या पराभवानंतर खूप निराशा होती मात्र कोणतीही निगेटिव्हिटी नव्हती. अनेकदा जेव्हा तुम्ही हरता तेव्हा संघातच विविध ग्रुप बनतात. मात्र सीएसकेमध्ये असे झाले नाही. 

पराभवानंतर धोनी करतो हे काम

2021पासून धोनी सीएसकेशी जोडला गेलेला आहे. याबाबत बोलताना ऋतुराज म्हणाला, प्रत्येक जण सामना हरल्यानंतर प्रत्येजण 10-15 मिनिटे शांत असतो. मात्र माही भाई प्रेझेंटेशनवरून परत आल्यानंतर आम्हाला सांगतो की आराम करा मुलांनो, असे होत असते. 

मैदानावर असतो शांत

आपल्या दीर्घ क्रिकेट करिअरदरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या केवळ कौशल्यानेच नव्हे तर आपल्या स्वभावानेही अनेक खेळाडूंना प्रभावित केले आहे तसेच प्रेरणा दिली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही तणावपूर्ण परिस्थिती असो धोनी अतिशय शांततेने ही परिस्थिती सांभाळत असतो. त्यामुळेच त्याला कॅप्टन कूल म्हटले जाते. 

अधिक वाचा - खाण हटवा, सुरजागड वाचवा; खाणीला आदिवासींचा विरोध

एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्स

ऋतुराज गायकवाडने या सामन्यात 159 बॉलमध्ये नाबाद 220 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 16 षटकार पाहायला मिळाले. ऋतुराजने स्पिनर शिवा सिंहच्या एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले. यात एका नो बॉलचा समावेश होता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी