Ruturaj Gaikwad 7 sixes record: IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना प्रसिद्धीच्या झोतात आलेला युवा फलंदाज ऋतूराज गायकवाड दर काही महिन्यांनी काहीतरी करतो ज्यामुळे त्याचे नाव चर्चेत येते. यावेळी त्याने जे काही केले त्यामुळे त्याचे नाव विक्रमाच्या यादीत कोरले गेले आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात ऋतूराज गायकवाडने जे केले ते कुणालाही अपेक्षित नव्हते. महाराष्ट्राकडून खेळताना त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध एका षटकात सात षटकार ठोकले आहे. (ruturaj gaikwad scores 7 sixes in an over of shiva singh during vijay hazare trophy quarter final match)
उत्तर प्रदेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या या देशांतर्गत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऋतूराज गायकवाडने उत्तर प्रदेशविरुद्ध द्विशतक झळकावले. विशेष म्हणजे त्याने उत्तर प्रदेशच्या शिवा सिंहच्या एकाच षटकात 43 धावा घेत आपले द्विशतक पूर्ण केले. डावातील 49वे षटक असताना गायकवाडचा हा वेगळा अवतार पाहायला मिळाला.
6⃣,6⃣,6⃣,6⃣,6⃣nb,6⃣,6⃣ — BCCI Domestic (@BCCIdomestic) November 28, 2022
Ruturaj Gaikwad smashes 4⃣3⃣ runs in one over!
Follow the match ▶️ https://t.co/cIJsS7QVxK…#MAHvUP | #VijayHazareTrophy | #QF2 | @mastercardindia pic.twitter.com/j0CvsWZeES
ऋतूराजने या षटकात सात षटकार मारले. त्यात नो-बॉलचाही समावेश होता. ऋतूराज गायकवाडने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा षटकार मारणाऱ्या युवराज सिंगची आठवण करून दिली. इकडे ऋतूराज युवराजपेक्षा एक पाऊल पुढे गेला.
या घरच्या वनडेत महाराष्ट्राचा कर्णधार आणि सलामीवीर ऋतूराज गायकवाडने 159 चेंडूत नाबाद 220 धावा केल्या. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे महाराष्ट्राने 50 षटकांत 5 गडी गमावून 330 धावा केल्या.