ब्रेकिंग! सचिन तेंडुलकर रुग्णालयामध्ये दाखल

 भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला करोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sachin Tendulkar admitted to hospital
ब्रेकिंग! सचिन तेंडुलकर रुग्णालयामध्ये दाखल  |  फोटो सौजन्य: BCCL

 मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला करोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून तो घरीच होम क्वारंटाइन होता. मात्र डॉक्टरांच्या सल्लानुसार आता रुग्णालयामध्ये दाखल झाला आहे. 

यासंदर्भातील माहिती स्वतः सचिननेच ट्विटरवरुन दिली आहे. यामुळे  सर्वांच्या काळजीत भर पडली आहे.

 
सचिनने केलेले ट्विट असे : माझ्या तब्बेतेसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. तसेच सर्व भारतीय आणि संघ सहकाऱ्यांचे विश्वचषक विजयाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. 

दुसरा वर्ल्ड कप जिंकायला १० वर्ष पूर्ण 

एकदिवसीय सामन्यातील दुसरा वर्ल्ड कप  भारतीय संघाने जिंकून आज बरोबर 10 वर्ष पूर्ण होत आहेत. याच संघाचा सचिन एक भाग होता. याच दिवसाचं निमित्त साधून सचिनने संपूर्ण भारतवासियांना तसंच संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनला २७ मार्चला कोरोनाची लागण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला गेल्या २७ मार्चला कोरोनाची लागण झाली. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटले होते. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग

सचिन तेंडुलकर नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला. या स्पर्धेत त्याने जबरदस्त बॅटिंग केली. सेहवागच्या साथीने सलामीला मैदानात येत त्याने इंडिया लिजेंड्सला स्पर्धेतील महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाकडून सचिनने सर्वाधिक धावा फटकावल्या. भारतीय संघाने या स्पर्धेत विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 14 धावांनी हरवून पहिली रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज भारताच्या नावार केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी