Sachin Tendulkar Record | सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून आपणा सर्वांनाच माहिती आहे. त्याची बॅटिंगची स्टाईल, आक्रमकपणा, वयानुसार त्याने आपल्या शैलीत केलेले बदल, त्याच्या नावावर असणारे रेकॉर्ड्स या सगळ्या गोष्टी अनेक चाहत्यांना तोंडपाठ असतात. मात्र सचिनचा गौरव हा नेहमी एक उत्तम फलंदाज म्हणजेच बॅट्समन म्हणून होतो. मात्र आपल्या पूर्ण कारकिर्दीत सचिननं बॉलिंगबाबतही अनेक रेकॉर्ड नावावर केले आहेत. जगात असे काही महान बॉलर आहेत, ज्यांच्यापेक्षा सचिन तेंडुलकरनं जास्त ओव्हर फेकल्या आहेत.
सचिन हा असा महान फलंदाज आहे, ज्याची बॅटिंग सुरू झाली की ती पाहतच राहावंसं वाटतं. बॅटिंगमधलं जवळपास प्रत्येक रेकॉर्ड सचिननं आपल्या नावे करून घेतलं आहे. मात्र बॅटसोबत बॉलनंही सचिननं अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. करिअरच्या शेवटच्या टप्प्यात त्याने बॉलिंग टाकणं कमी केलं. मात्र त्यापूर्वी जवळपास प्रत्येक सामन्यात सचिन बॉलिंग करत असे. जगातील अनेक जलदगती गोलंदाजांपेक्षाही जास्त बॉल टाकण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावे जमा आहे. सचिनने 463 एकदिवसीय सामने खेळले ज्यात 1342 ओव्हर टाकल्या आणि 154 विकेट घेतल्या आहेत.
मॅच - 163, विकेट - 247
सचिन तेंडुलकरसोबत ज्याची नेहमीच मैदानावर ठसन असायची, त्या वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत सचिनपेक्षाही कमी ओव्हर टाकल्या आहेत. शोएब अख्तरनं 163 एकदिवसीय सामने, 46 कसोटी सामने आणि 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
स्टुअर्ट ब्रॉडला कोण ओळखत नाही? सचिन आणि ब्रॉड कित्येक सामन्यांत आमनेसामने आले होते. सचिननं बॅटचा वापर करून ब्रॉडला चोपून काढत होताच, मात्र बॉलच्या बाबतीतही त्याने ब्रॉडला मागे टाकलं आहे. 537 विकेट घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडनं त्याच्या करिअरमध्ये 1018 ओव्हर गोलंदाजी केली आहे. 121 एकदिवसीय आणि 56 टी-20 सामने तो खेळला आहे.
मॅच - 125, विकेट - 196
डेल स्टेन हा दक्षिण अफ्रिकेचा लोकप्रिय गोलंदाजदेखील ओव्हर फेकण्याच्या बाबतीत सचिनच्या मागेच आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1042 ओव्हर फेकल्या आहेत. एकूण 125 सामने तो खेळला असून 196 विकेट त्याच्या नावे आहेत. एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत त्याची कसोटी कारकिर्द दीर्घ होती.