झणझणीत मिसळवर सचिन तेंडूलकरने मारला ताव, म्हणाला, 'रविवार असो किंवा सोमवार खाणारच'

sachin tendulkar eat misal pav : सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मिसळ पाव खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Sachin Tendulkar eat misal pav, says 'I will eat on Sunday or Monday'
झणझणीत मिसळवर सचिन तेंडूलकरने मारला ताव, म्हणाला, 'रविवार असो किंवा सोमवार खाणारच'  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सचिन तेंडूलकर यांनी 'मिसळ पाव' वर मारला ताव
  • महाराष्ट्राची मिसळ पाव म्हणजे एक नंबर असल्याचं त्याने म्हटलं आहे.
  • हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

sachin tendulkar eat misal pav मुंबई : मराठी माणूस आणि महाराष्ट्रात (maharashtra) मिसळ पावंचं (misal pav) एक वेगळंच स्थान आहे. अगदी कोल्हापूरी असो वा पुणेरीवा नाशिक मिसळ जिल्हा बदललं की थोडी चव बदलते पण झटका तोच असतो. त्यामुळे झणझणीत मिसळ म्हटलं की लहानांपासून थोरांपर्यत आणि सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटिंपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटणारच. आज रविवारी आपल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने (sachin tendulkar) सकाळी सकाळी झणझणीत मिसळवर ताव मारताना टाकलेल्या व्हिडिओने दिवसभर धुमाकूळ घातला आहे. (Sachin Tendulkar eat misal pav, says 'I will eat on Sunday or Monday')

क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने मैदानात बॅटिंग करताना अनेक देशांच्या संघ आणि त्यांच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला आहे. त्यांची बॅटिंग पाहणे हे प्रत्येकासाठी अविस्मणीय क्षण असतो. त्यामुळे त्याने लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याची बॅटिंग पाहणे दुरापास्त झाले आहे. पण तो सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करुन दर्शन देत असतो.

सचिन तेंडुलकर रविवार  दि. १२ रोजी सकाळी चक्क मिसळ पावंवर तुटून पडल्याचं पाहायला मिळाला. सचिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. यावेळी महाराष्ट्राची मिसळ पाव म्हणजे एक नंबर असल्याचं त्याने म्हटलं आहे. तसंच रविवार असो वा सोमवार मिसळ पाव मी कधीही खाऊ शकतो असं कॅप्शनही सचिनने दिलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सचिनने अनेकवेळा मुलाखती दरम्यान आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितले आहे. कधीकधी त्याने स्वतः घरात वेगवेगळे पदार्थ तयार करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सचिनला महाराष्ट्रातील जेवण सर्वाधिक आवडते. त्याच बरोबर त्याला सी फुडची आवड आहे. वडा पाव देखील त्याला आवडतो. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 या व्हिडिओला कॅप्शन देत सचिन तेंडुलकरने लिहिले की, “रविवार असो किंवा सोमवार मी मिसळ पाव खाणारच”. त्यापुढे त्याने लिहिले की, “तुमचा आवडता नाश्ता कुठला आहे?..”

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर म्हणतोय की, “महाराष्ट्राची मिसळ पाव एकच नंबर आहे.” मिसळ हा प्रत्येकाच्य़ा जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी सचिन तेंडुलकरच्याही आणि हे त्याने त्याच्या व्हिडीओमधून पुन्हा एकदा चाहत्यांना नकळत दाखवून दिलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी