Happy Birthday God: सचिनचा आज ४६ वा बर्थडे, जाणून घेऊया सचिनच्या काही खास गोष्टी 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 24, 2019 | 13:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

क्रिकेट क्षेत्रातल्या इतिहासात सर्वांत चांगली बॅटिंग करणारा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आज ४६ वर्षांचा झाला. आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊया सचिनसाठी सर्वांत बेस्ट इनिंग कोणती होती. 

Sachin Tendulkar
Happy Birthday God: सचिनचा आज ४६ वा बर्थडे, जाणून घेऊया सचिनच्या काही खास गोष्टी   |  फोटो सौजन्य: AP

Sachin Tendulkar celebrating his 46th birthday: तब्बल २४ वर्ष क्रिकेट क्षेत्रात राज्य करणारा सचिन तेंडुलकर आज आपला ४६ ला बर्थडे साजरा करतोय. दादरच्या शारदाश्रम विद्यामंदीर शाळेतून क्रिकेट खेळायला सुरूवात करणाऱ्या सचिननं क्रिकेटर होण्याचं स्वप्न तेव्हाच पाहिलं. सचिननं जगातल्या प्रत्येक बॉलरला दाखवून दिलं की बॉल नेमका किती प्रकारनं खेळता येतो. ज्यानं भारतीय क्रिकेटला एक नवीन ओळख निर्माण करून दिली. आज तोच महान व्यक्तिमत्त्व ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातल्या कोट्यवधी क्रिकेट फॅन्ससाठी २४ एप्रिलला हा दिवस कोणत्याही  सणापेक्षा कमी नसतो. सचिनचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर आता आपल्यासोबत नसले तरी आज त्यांनी जगाला असा एक रत्न दिला की ज्यानं तिरंग्याला सन्मान मिळवून देण्यासाठी कोणतीच संधी सोडली नाही. आज सचिन जरी क्रिकेट खेळत नसला तरी आजचा दिवस पुन्हा एकदा सगळ्यांसाठी  आनंदाचा आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक करणारा सचिन तेंडुलकर सध्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्ससोबत सल्लागार म्हणून जोडला गेला आहे. मैदानातली सचिनची उपस्थिती अजूनही युवा खेळाडूंना प्रेरित करत असते. सचिननं आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये अफालातून कामगिरी केली. आज सचिनची कामगिरी जगभरात सगळ्यांना माहितच आहे. आज जर का सचिनच्या फॅन्सना विचारलं की सचिनची आवडती इनिंग कोणती तर सगळे वेगवेगळी उत्तरं आपल्याला ऐकायला मिळतील. म्हणून स्वतः सचिनला त्याची कोणती इनिंग आवडते हे जाणून घेऊया. 

ही इनिंग सचिनसाठी आहे खूप खास 

मास्टर ब्लास्टर सचिंन तेंडुलकरनं जगभरातल्या प्रत्येक देशात, प्रत्येक मैदानावर आपली छाप सोडली. प्रत्येक देशाच्या टीमविरूद्ध खेळताना सचिननं एक वेगळा रेकॉर्ड बनवला. मात्र सचिनची अशी एक इनिंग आहे जी स्वतः सचिनला खूप आवडते. सचिननं काही दिवसांपूर्वीच स्वतःहून या इनिंगला सर्वांत आवडती इनिंग असल्याचं म्हटलं होतं. ही इनिंग होती १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंटवर खेळलेली. तेव्हा सचिननं १४८ धावा करत नाबाद राहिला होता.

आवडत्या इनिंग मागचं खास कारण

ऑस्ट्रेलिया टीममध्ये त्यावेळी मॅकडरमॉट, ब्रूस रीड, मर्व ह्यूज आणि शेन वॉर्न सारखे बॉलर होते. वेगवान बॉलर आणि स्पिनर्सच्या बॉलिंगच्या लाइन अपविरूद्ध सिडनीच्या पिचवर एक असा खेळाडू मैदानात होता त्याच्याकडे केवळ तीन वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव होता. त्यावेळी त्याच्या खात्यात ६६६ रनचं होते. सामन्यात ऑस्ट्रेलिया टीमनं पहिल्यांदा बॅटिंग करत डेविड बून (नाबाद १२९) नं शतकाच्या जोरावर ३१३ स्कोअर केले होते. त्यानंतर टीम इंडिया जेव्हा बॅटिंग करण्यासाठी उतरली  त्यानंतर ७ रन करून नवज्योत सिंह सिद्धू आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र रवि शास्त्री (२०६)  करत द्विशतक केलं आणि खेळ सांभाळून घेतला होता. यावेळी सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करणारा युवा क्रिकेटर सचिन मैदानावर आला. सचिननं २९८ मिनिटांमध्ये २१३ बॉलमध्ये नाबाद १४८ रन केलं. या खेळीत १४ चौकारांचा समावेश होता. 

विशेष रेकॉर्ड 

सचिन तेंडुलकरच्या नाबाद १४८ धावांची खेळी सर्वांत खास ठरली. कारण या खेळीसोबत ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट शतक करणारा सर्वांत कमी वयातील खेळाडू ठरला होता. ऑस्ट्रेलिया बॉलर्संनी सर्व दिग्गज भारतीय खेळाडूंना आऊट केलं मात्र ते सचिनला आऊट करू शकले नाही. सचिनच्या खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या खेळात ऑलआऊट होण्याआधी ४८३ धावांचा स्कोअर केला. शेवटच्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या खेळात ८ विकेटवर १७३ रन केले. त्यानंतर भारतानं हा सामना ड्रॉ केला. विशेष म्हणजे, सचिननं या सिरीजच्या पाचव्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात देखील आपली कमाल दाखवली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Happy Birthday God: सचिनचा आज ४६ वा बर्थडे, जाणून घेऊया सचिनच्या काही खास गोष्टी  Description: क्रिकेट क्षेत्रातल्या इतिहासात सर्वांत चांगली बॅटिंग करणारा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आज ४६ वर्षांचा झाला. आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊया सचिनसाठी सर्वांत बेस्ट इनिंग कोणती होती. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola