वर्ल्डकप की पाकिस्तानविरुद्ध विजय? सचिनने सांगितले, भारतासाठी काय आहे महत्त्वाचे

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 27, 2019 | 12:25 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मते वर्ल्डकप २०१९मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याला जास्त प्राधान्य देऊ नये.

sachin tendulkar
सचिन तेंडुलकर(PTI/AP) 

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्या खेळवला जाणारा हा सामना एखाद्या युद्धापेक्षा काही कमी नसतो. आयसीसी वर्ल्डकप २०१९मध्ये हे दोनही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. १६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा सामना रंगतो तेव्हा या सामन्याचा फिव्हर चाहत्यांवर चढलेला असतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना हा इतर सामन्यांच्या कित्येक पटीने महत्त्वाचा ठरतो. दोन्हीही संघ जिंकण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च करतात. 

गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडल्याने यांच्यात द्विपक्षीय मालिका होऊ शकलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत एकमेकांसमोर येतात. पाकिस्तानसाठी वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धची लढत ही नेहमीच कठीण राहिली आहे. पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकदाही भारताविरुद्ध जिंकू शकलेला नाही. दोन्ही संघांदरम्यान वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळवण्यात आले यातील प्रत्येक सामन्यात भारताने पाकिस्तानला मात दिली. 

या सामन्याची चाहते भलेही खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे मात्र महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मते या सामन्याला अधिक प्राधान्य दिले जाऊ नये. सचिनच्या मते भारतीय संघाला इंग्लंडमध्ये वर्ल्डकप जिंकण्यासाठी गेली आहे एका संघाविरुद्ध सामना जिंकण्यासाठी नव्हे. 

सचिन पुढे म्हणाला, हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे तसाच आहे आणि मी त्याच पद्धतीने उत्तर देणार आहे. २००३मध्ये लोकांनी हे ठरवण्यास सुरूवात केली की काहीही झाले तर भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध विजय हा मिळवावाच लागेल. सचिन पुढे म्हणाला, यामुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो मात्र त्यांनी समजले पाहिजे की भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी गेला आहे तर केवळ कोणा एका संघाविरुद्ध जिंकण्यासाठी नव्हे. 

सचिन म्हणाला, काही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांऐवजी वर्ल्ड चॅम्पियनच्या रूपात ही स्पर्धा संपवणे अभिमानास्पद ठरेल. केवळ एक सामना जिंकण्याऐवजी भारत वर्ल्डकप जिंकण्याची मी आशा करतो. तुम्ही फक्त चांगले क्रिकेट खेळा, असेही सचिनने सांगितले. 

भारतीय संघाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना ५ जूनला द.आफ्रिकेविरुद्ध होत आहे.

वर्ल्डकपमधील संपूर्ण कार्यक्रम

  1. इंग्लंड विरुद्ध द. आफ्रिका - ३० मे- लंडन - दुपारी ३ वाजता
  2. पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज - ३१ मे - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  3. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका - १ जून - कार्डिफ - दुपारी ३ वाजता
  4. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया - १ जून - ब्रिस्टल - संध्याकाळी ६ वाजता डे नाईट
  5. बांगलादेश विरुद्ध द. आफ्रिका - २ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  6. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान - ३ जून - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  7. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका - ४ जून कार्डिफ - दुपारी ३ वाजता
  8. भारत विरुद्ध द.आफ्रिका - ५ जून - साऊथम्प्टन - दुपारी ३ वाजता
  9. बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड - ५ जून - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  10. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टइंडीज - ६ जून - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  11. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका - ७ जून - ब्रिस्टल - दुपारी ३ वाजता
  12. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश - ८ जून - कार्डिफ - दुपारी ३ वाजता
  13. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड - ८ जून - टॉन्टन- संध्याकाळी ६ वाजता डे नाईट
  14. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ९ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  15. वेस्ट इंडिज विरुद्ध द. आफ्रिका - १० जून - साऊथम्पटन - दुपारी ३ वाजता
  16. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - ११ जून- ब्रिस्टल - दुपारी ३ वाजता
  17. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान १२ जून टॉन्टन - दुपारी ३ वाजता
  18. भारत विरुद्ध न्यूझीलंड - १३ जून - नॉटिंग्हम - दुपारी ३ वाजता
  19. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज - १४ जून - साऊथम्पटन - दुपारी ३ वाजता
  20. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - १५ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  21. अफगाणिस्तान विरुद्ध द. आफ्रिका - १५ जून - कार्डिफ - संध्याकाळी ६ वाजता डे नाईट
  22. भारत विरुद्ध पाकिस्तान - १६ जून - मँचेस्टर - दुपारी ३ वाजता
  23. बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडीज - १७ जून - टॉन्टन - दुपारी ३ वाजता
  24. अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड - १८ जून - मँचेस्टर - दुपारी ३ वाजता
  25. न्यूझीलंड विरुद्ध साउथ अफ्रीका - १९ जून - बर्मिंग्हम - दुपारी ३ वाजता
  26. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश - २० जून - नॉटिंघम - दुपारी ३ वाजता
  27. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका - २१ जून - लीड्स - दुपारी ३ वाजता
  28. भारत विरुद्ध अफगाणिस्तान - २२ जून - साऊथम्पटन - दुपारी ३ वाजता
  29. न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडीज - २२ जून - मँचेस्टर - संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
  30. पाकिस्तान विरुद्ध साउथ अफ्रीका - २३ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  31. अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश - २४ जून - साऊथम्पटन - दुपारी ३ वाजता
  32. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया - २५ जून - लंडन - दुपारी ३ वाजता
  33. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - २६ जून - बर्मिंग्हम - दुपारी ३ वाजता
  34. भारत विरुद्ध वेस्टइंडीज - २७ जून - मँचेस्टर - दुपारी ३ वाजता
  35. द. आफ्रिका विरुद्ध श्रीलंका - २८ जून - चेस्टर ले स्ट्रीट - दुपारी ३ वाजता
  36. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान - २९ जून - लीड्स - दुपारी ३ वाजता
  37. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - २९ जून - लंडन - संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
  38. भारत विरुद्ध इंग्लंड - ३० जून - बर्मिंग्हमन - दुपारी ३ वाजता
  39. श्रीलंका विरुद्ध वेस्टइंडीज - १ जुलै- चेस्टर ले स्ट्रीट - दुपारी ३ वाजता
  40. भारत विरुद्ध बांग्लादेश - २ जुलै- बर्मिंग्हम - दुपारी ३ वाजता
  41. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड - ३ जुलै- चेस्टर ले स्ट्रीट - दुपारी ३ वाजता
  42. अफगाणिस्तान विरुद्ध वेस्टइंडीज - ४ जुलै- लीड्स - दुपारी ३ वाजता
  43. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश - ५ जुलै- लंडन - संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
  44. भारत विरुद्ध श्रीलंका - ६ जुलै- लीड्स - दुपारी ३ वाजता
  45. ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका - ७ जुलै- मँचेस्टर - संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
  46. पहला सेमीफाइनल - ९ जुलै- मँचेस्टर - दुपारी ३ वाजता
  47. दूसरा सेमीफाइनल - ११ जुलाई- बर्मिंग्हम - दुपारी ३ वाजता
  48. फायनल - १४ जुलै- लंडन (लॉर्ड्स) - दुपारी ३ वाजता 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी