Sachin Tendulkar : हैद्राबादमध्ये सुरू असलेल्या मोटार शोमध्ये जगातली सगळ्यात वेगवान प्योर-इलेक्ट्रिक हाइपर जीटी 'बतिस्ता' कार महिंद्राने आणली आहे. महिंद्राने जी कार बाजारात आणली आहे ती सगळ्यात वेगवान इलेक्ट्रिक हाइपर कार आहे. या कारची निर्मिती महिंद्राच्या ऑटोमोबाइल पिनिनफेरिनाने केली आहे. या कारचं नाव बतिस्ता (Battista) आहे.
अधिक वाचा : India vs Australia : ऑस्ट्रेलिया विरुद्धची नागपूर टेस्ट जिंकूनही भारताला 4 खेळाडूंची चिंता
ही कार फक्त 1.86 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठते. कारला 0 ते 200 किमी/ताशी वेग गाठण्यासाठी फक्त 4.75 सेकंद लागतात. वाहन बनवणारी कंपनीने स्टॅबिलिटी आणि ब्रेकिंगवर अधिक काम केले आहे. यावर कंपनीने असे म्हटले आहे की, ही कार 100 ते 0 च्या वेगात असेल तरीही 31 मीटर अंतरावर थांबता येते.
या कारचं डिझाईन महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या इटालियन लक्झरी कार ब्रांड ऑटोमोबिली पिनिनफेरिनाने केले आहे. कारच्या चाकांना पाॅवर देण्यासाठी दोन वेगळ्या मोटर दिल्या आहेत. 1400 kW चे एकत्रित पॉवर आउटपुट देत आहे. त्याची मोटर 1900 bhp पॉवर आणि 2300 Nm टॉर्क जनरेट करते.
अधिक वाचा : दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा स्फोटाने ब्रिटन हादरलं, बघा घटनास्थळावरील LIVE VIDEO
कारमध्ये 120 किलो वॅटची लिथियम आयन बॅटरी दिली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 476 किलोमीटरपर्यंत चालते. कारची पूर्ण बॅाडी ही कार्बन फाइबरपासून बनवली आहे. कारचे एक मॉडेल असेंबल करण्यासाठी 1 हजार 250 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. यामुळे कंपनी फक्त 150 युनिटचं बनवणार आहे. या कारची किंमत 19.45 कोटी इतकी आहे.