आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने बनवला होता रेकॉर्ड जो अद्याप मोडला गेलेला नाही

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 20, 2020 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने २० सप्टेंबर २००९मध्ये अहमदाबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात एक जबरदस्त रेकॉर्ड केला. हा रेकॉर्ड अद्याप कोणी मोडू शकलेला नाही. 

sachin tendulkar
सचिन तेंडुलकरने बनवला होता रेकॉर्ड जो अद्याप मोडला नाही 

थोडं पण कामाचं

  •  सचिनने २० नोव्हेंबर २००९मध्ये अहमदाबादमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात एक रेकॉर्ड केला होता
  • सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नाही.
  • तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० हजार धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला होता.

मुंबई: जगातील महान फलंदाजांपैकी एक सचिन तेंडुलकर(sachin tendulkar) आणि त्याच्या चाहत्यांसाठी २० नोव्हेंबर हा दिवस खूपच खास आहे. कारण ११ वर्षांपूर्वी याच दिवशी सचिनने एका मोठा रेकॉर्ड(big record) आपल्या नावे केला होता. हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणी मोडू शकलेला नाही. सचिनने २० नोव्हेंबर २००९मध्ये अहमदाबादमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात एक रेकॉर्ड केला होता. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० हजार धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला होता. सचिनने ही कामगिरी सीरिजच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी केली होती. 

अहमदाबाद कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात सचिनने चनाका वेलेगेदराच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगमध्ये खेळत एकेरी धाव घेतली आणि आपल्या ३५ धावा करत या रेकॉर्डला गवसणी घातली होती. तेव्हा मास्टरब्लास्टरने ४३६ वनडेमधज्ये ४४.५च्या सरासरीने १७१७८ धावा केल्या. तर कसोटीमध्ये त्याची धावसंख्या  १२८१२ पर्यंत पोहोचली होती. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना एका टी-२० सामन्यात १० धावांची खेळी करत तीनही फॉरमॅटमध्ये त्याची एकूण धावसंख्या ३० हजार झाली होती. 

सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नाही. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांच्या यादीत मास्टर ब्लास्टरनंतर कुमार संगकाराचा नंबर लागतो. त्याच्या नावावर २८०१६ धावा आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग तिसऱ्या स्थानावर आहे त्याने २७४८३ धावा केल्या आहेत. ४७ वर्षीय सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २०० कसोटी सामन्यात १५,९२१, ४६३ वनडेमध्ये १८४२६ आणि एका  टी-२० सामन्यात १० धावा केल्या होत्या. 

विराट-स्मिथमध्ये असेल शतकांची स्पर्धा, सचिनचा रेकॉर्ड निशाण्यावर

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गत भारत-ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा मैदानावर खेळण्यासाठी उतरेल तेव्हा अनेक रेकॉर्ड निशाण्यावर असतील. यातील खास रेकॉर्ड म्हणजे कसोटीमधील सर्वाधिक शतके. हा रेकॉर्ड सध्या भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याच्या नावावर सर्वाधिक ९ शतके आहेत. सध्याच्या खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ(दोघांची ७ शतके)सगळ्यात जवळ आहेत. कोहलीकडे केवळ बरोबरी करण्याची संधी आहे कारण तो फक्त एक कसोटी खेळणार आहे. 

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ ७-७ शतकांसह मायकल क्लार्कसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. विराट कोहली सीरिजमधील एकच मॅच खेळणार आहे. तर दुसरीकडे स्मिथ संपूर्ण सीरिज खेळणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी