IND vs NZ Semi-Final: सचिन तेंडुलकरने म्हटले, न्यूझीलंडने केली मोठी चूक 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 10, 2019 | 16:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand World Cup Semifinal: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळण्यात येणाऱ्या सेमीफायनल सामन्याबाबत सचिन तेंडुलकरने एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्यानुसार न्यूझीलंडने एक मोठी चूक केली आहे. 

sachin tendulkar
सचिन तेंडुलकर  

थोडं पण कामाचं

  • सचिनने म्हटले न्यूझीलंडने केली प्रथम फलंदाजी घेऊन केली मोठी चूक
  • न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचा फायदा करून नाही घेतला.
  • गेल्या पाच सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला ओल्ड ट्रॅफर्डवर

मॅन्चेस्टर :  टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वर्ल्ड कप २०१९ च्या सेमी फायनलने एक नाटकीय रूप धारण केले आहे. मंगळवारला सामना सुरू झाला, न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाची सुरूवात चांगली नाही राहिली. रॉस टेलरने कालच्या दिवशी नाबाद ६७ धावा करून न्यूझीलंडचा डाव सांभाळला.  पाऊसामुळे खेळ थांबला तो पर्यंत न्यूझीलंडने ४६.१ ओव्हरमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात २११ धावा केल्या. आज त्यांनी ५० षटकात ८ बाद २३९ धावा करून डाव संपवला. पावसामुळे काल खेळ सुरू झाला नाही. त्यामुळे आज मॅच पुन्हा सुरू झाली. न्यूझीलंडमध्ये संतुलन राखत काल ५ बाद २११ धावा केल्या पण महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने म्हटले की किवी संघाने एक मोठी चूक केली आहे. 

महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने फेसबूकवर एक व्हिडिओ स्टोरी पोस्ट करताना तो मॅच दरम्यान मॅन्चेस्टरच्या बाल्कनीवर उभा आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर म्हणाला, मी ओल्ड ट्रॅफर्डवर उभा आहे. खूप चांगले वातावरण आहे. या ठिकाणी न्यूझीलंडने मला जरा आश्चर्याचा धक्का दिला की त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याच्या टॉसवर सर्वांच्या नजरा होत्या. सर्वांचे मत होत की टॉस जिंकणारी टीम प्रथम फलंदाजी घेणार, झाले पण तसे पण सचिन निराश का आहे. 

सचिन तेंडुलकरच्या मते मॅन्चेस्टरमध्ये सतत पाऊस पडत होता. ओव्हरकास्ट कंडिशनमध्ये स्विंग गोलंदाजांना खूप फायदा मिळतो आणि न्यूझीलंडकडे असे आक्रमण आहे, जे भारतावर दबाव टाकू शकत होते. ट्रेंट बोल्ड, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेनरी यांचे त्रिकूट आणि जिमी निशम आणि कॉलिन डी ग्रँडहोम आपल्या वेगवान गोलंदाजीने भारतावर दबाव टाकू शकत  होते. 

मॅन्चेस्टरमध्ये वर्ल्ड कपचे आतापर्यत पाच सामने झाले आहेत. या सामन्या प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. यात भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याचाही समावेश आहे.  ओव्हरकास्ट कंडिशन आणि किवी संघाच्या गोलंदाजीचे आक्रमण पाहता या ठिकाणी गोलंदाजी करणे फायद्याचे राहिले असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IND vs NZ Semi-Final: सचिन तेंडुलकरने म्हटले, न्यूझीलंडने केली मोठी चूक  Description: India vs New Zealand World Cup Semifinal: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळण्यात येणाऱ्या सेमीफायनल सामन्याबाबत सचिन तेंडुलकरने एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्यानुसार न्यूझीलंडने एक मोठी चूक केली आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola