Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरचा किचनमध्येही जलवा, ऑम्लेट पाहून ब्रेट ली म्हणाला, खायला येतोय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 22, 2022 | 12:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sachin Tendulkar cooking: क्रिकेटमधील रेकॉर्डचा बादशाह आणि महान फलंदाजांपैकी एक सचिन तेंडुलकर आता किचनमध्ये आपली पाककला दाखवत आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो परफेक्ट ऑम्लेट बनवण्याबाबत सांगत आहे. 

sachin tendulkar
सचिन तेंडुलकरचा किचनमध्ये दाखवतोय पाककला 
थोडं पण कामाचं
  • क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन नव्या व्हिडिओमध्ये किचनमध्ये आपला हात साफ करताना दिसत आहे.
  • या दरम्यान तो परफेक्ट ऑम्लेटबाबत सांगतो
  • डेहराडूनच्या एका हॉटेलमध्ये सचिन आपली पाक कला दाखवत आहे.

मुंबई: भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर(sachin tendulkar) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह(active) असतो. तो अनेकदा आपले फोटोज व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. चाहेतेही या फोटोंना तसेच व्हिडिओला पसंती देत असतात. सचिनने आपला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर(instagram) शेअर केला आहे. यात तो केवळ अंडा ऑम्लेट(egg omlette) बनवतच नाही तर शिकवताना दिसत आहे. sachin Tendulkar share omlette making video

अधिक वाचा - कलशावर का लावतात अशोकाची पानं?

हॉटेलमध्ये दिसली पाककला

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन नव्या व्हिडिओमध्ये किचनमध्ये आपला हात साफ करताना दिसत आहे. या दरम्यान तो परफेक्ट ऑम्लेटबाबत सांगतो. डेहराडूनच्या एका हॉटेलमध्ये सचिन आपली पाक कला दाखवत आहे. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजसाठी डेहराडूनमध्ये आहे.त्यानेकाही दिवसांपूर्वी आपल्या बॅटची ग्रिप धुण्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. सचिनने जसे ऑम्लेट वर उडवून फ्लिप केले तेव्हा हॉटेलच्या किचन स्टाफने टाळ्या वाजवल्या. 

ब्रेट लीने केली कमेंट

क्रिकेट रेकॉर्डचा बादशाह सचिनने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, फ्लिक असो वा फ्लिप. ऑम्लेट नेहमी परफेक्ट असले पाहिजे. त्याच्या या व्हिडिओ लाखो लाईक्स मिळाले आहेत. इतकंच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर ब्रेट लीनेतर त्याचे कौतुकही केले आहे.सोबतच लिहिले की, मित्रा मी उद्या ब्रेकफास्टसाठी येत आहे. 

अधिक वाचा - माकडांशी घेतला पंगा, पूर्वजांनी दिला प्रसाद!

इंडिया लीजेंड्सचे करतोय नेतृत्व

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर इंडिया लीजेंड्सचे नेतृत्व करत आहे. कानपूरमध्ये या टीमने स्टुअर्ट बिन्नीच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर २० ओव्हरमध्ये ४ बाद २१७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिका लीजेंड्स संघाला ९ बाद १५६ धावा करता आल्या. इंदूरमध्ये खेळवण्यात आलेला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी