Sourav Ganguly Birthday:सचिन तेंडुलकर- सौरव गांगुलीची कुठे झाली पहिली भेट?, मास्टर ब्लास्टरनं सांगितली क्रिकेटपलीकडची मैत्री

Sourav Ganguly Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (master blaster Sachin Tendulkar) आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI president Sourav Ganguly) यांच्या मैत्रीची सर्वांनाच कल्पना आहे.

Sachin Tendulkar on Sourav Ganguly
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली  |  फोटो सौजन्य: PTI
थोडं पण कामाचं
  • आज सौरव गांगुलीचा 50 वा वाढदिवस आहे.
  • गेल्या अनेक वर्षांपासून सचिन तेंडुलकर यांनी सौरव गांगुली यांना त्यांच्या विविध अवतारांमध्ये पाहिलं आहे.
  • दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही दोघांमधली मैत्री तितकीच घट्ट आहे.

नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (master blaster Sachin Tendulkar) आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI president Sourav Ganguly)  यांच्या मैत्रीची सर्वांनाच कल्पना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सचिन तेंडुलकर यांनी सौरव गांगुली यांना त्यांच्या विविध अवतारांमध्ये पाहिलं आहे. दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही दोघांमधली मैत्री तितकीच घट्ट आहे. आज सौरव गांगुलीचा 50 वा वाढदिवस आहे. गांगुली यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या सलामी जोडीदारासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना, सचिन यांनी पीटीआयशी अनेक पैलूंवर चर्चा केली.

''समतोल कसा साधायचा हे सौरवला चांगलं माहित होतं''

कॅप्टनपदाच्या काळात म्हणजेच जवळपास पाच वर्षांच्या कारकिर्दीत गांगुलीनं त्याला किती स्वातंत्र्य दिले, असे विचारले असता तेंडुलकर यांनी सांगितलं की, सौरव एक उत्तम कॅप्टन होता. समतोल कसा साधायचा हे त्याला चांगलं माहित होतं. खेळाडूंना किती स्वातंत्र्य आणि जबाबदारी द्यायची हे त्याला चांगलं माहित असायचं. सौरवनं जेव्हा कॅप्टन पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा भारतीय क्रिकेट बदलाच्या काळातून जात होते. तेव्हा आम्हाला भारतीय क्रिकेटला पुढे नेणारे खेळाडू हवे होते.

अधिक वाचा-  ​घरीच्या घरी बनवा असा झटपट टेस्टी मटार पुलाव​

त्यावेळी आपल्याला वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग आणि आशिष नेहरासारखं जागतिक दर्जाचे खेळाडू मिळाले. ते सर्व खूप हुशार होते पण त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस पाठिंबा हवा होता जो सौरवने दिला. त्यांना स्वतःच्या शैलीनुसार खेळण्याचं स्वातंत्र्यही मिळाले, असं सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं आहे. 1999 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांनी कर्णधारपद सोडल्यास पुढचा कर्णधार कोण असेल हे सुद्धा ठरवले होतं, असंही त्यांनी म्हटलं. 

सौरवला दिला होता उपकर्णधार बनण्याचा सल्ला

सचिन पुढे म्हणाले, कर्णधारपद सोडण्यापूर्वी मी सौरवला भारतीय टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाचा उपकर्णधार होण्याचा सल्ला दिला होता. मी त्याला जवळून पाहिले आणि त्याच्यासोबत क्रिकेट खेळलो. तो भारतीय क्रिकेटला पुढे नेऊ शकतो याची मला कल्पना होती. तो चांगला कर्णधार होता. यानंतर सौरवनं मागे वळून पाहिले नाही आणि त्याचे यश आपल्यासमोर आहे, असे ते म्हणाले.

एकमेकांसोबत करायचे मस्ती

तेंडुलकर यांनी सांगितलं, सौरव आणि मी टीमला सामना जिंकता यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही त्यापलीकडे काहीही विचार केला नाही. गांगुली पहिल्यांदा 1992 मध्ये भारतासाठी खेळला आणि नंतर 1996 मध्ये परतला. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते पण दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. 

अधिक वाचा- घरच्या घरी बनवा Fevicol, झटपट आणि सोपी पद्धत

तेंडुलकर म्हणाले, 1991 च्या दौऱ्यात आम्ही एकाच रुममध्ये राहायचो आणि आम्ही दोघं खूप मजा आणि मस्ती करायचो. आम्ही एकमेकांना अंडर 15 च्या दिवसांपासून ओळखतो त्यामुळे आमच्यात चांगले संबंध होते. त्या दौऱ्यानंतरही आम्ही भेटलो पण तेव्हा मोबाईल फोन नव्हते. आम्ही संपर्कात राहिलो नाही पण मैत्री कायम आहे.

कानपूरमध्ये झाली होती पहिली भेट 

बीसीसीआयने कानपूरमध्ये आयोजित केलेल्या ज्युनियर स्पर्धेत दोघांची पहिली भेट झाली. यानंतर दोघांनी इंदूरमध्ये दिवंगत वासू परांजपे यांच्या देखरेखीखाली झालेल्या वार्षिक शिबिरात बराच वेळ एकत्र घालवला. तेंडुलकर यांनी सांगितलं, आम्ही इंदूरमधील अंडर-15 शिबिरात बराच वेळ एकत्र घालवला आणि एकमेकांना ओळखले. तिथूनच आमची मैत्रीला सुरूवात झाली. त्याने, जतीन परांजपे (वासूचा मुलगा) आणि केदार गोडबोले यांनी गांगुलीच्या रुममध्ये पाणी कसे ओतले ते सांगितलं.

पुढे सचिन तेंडुलकर सांगतात की, मला आठवतं सौरव दुपारी झोपला होता. जतीन, केदार आणि मी त्याची रुम पाण्यानं भरून टाकली. त्याला जाग आल्यावर नेमकं काय झाले ते त्याला समजले नाही. त्याची सुटकेस पाण्यात तरंगत होती. नंतर त्याला कळले की आम्ही ती मस्ती केली आहे. आम्ही फक्त एकमेकांची मस्करी करायचो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी