सचिन तेंडुलकरने सामन्यादरम्यान वीरेंद्र सेहवागला दिली होती ही धमकी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 06, 2021 | 15:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुल्तानचा सुल्तान अशी ओळख असलेल्या सेहवागने एका बांग्ला शोमध्ये हे गुपित उघड केले. या शोसाठी अँकरिंग करत होता सौरव गांगुली.

sehwag
सचिन तेंडुलकरने सेहवागला दिली होती ही धमकी 

थोडं पण कामाचं

  • सेहवागने एका बांग्ला शोमध्ये हे गुपित उघडले.
  • वीरेंद्र सेहवागला अशी धमकी मिळाली होती आणि ही धमकी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर होता. 
  • या शोसाठी सौरव गांगली अँकरिंग करत होता. शोमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, झहीर खान, हरभजन सिंग आणि रवीचंद्रन अश्विनही उपस्थित होते

मुंबई: क्रिकेट मॅचमध्ये जर फलंदाज फोर-सिक्स मारत असेल तर त्याला साऱ्यांचेच कौतुक मिळते मात्र तुम्ही ऐकलंय का की एखाद्याफलंदाजाने सिक्स मारण्यासाठी त्याच्या सहकारी खेळाडूने मनाई केली. इतकंच नव्हे तर सिक्स मारल्यास बॅटने मारेन अशी धमकीही दिली होती. तुम्हालाही खोटं वाटलं असेल नाही. पण हे खरं आहे. वीरेंद्र सेहवागला अशी धमकी मिळाली होती आणि ही धमकी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर होता. 

सेहवागने एका बांग्ला शोमध्ये हे गुपित उघडले. या शोसाठी सौरव गांगली अँकरिंग करत होता. शोमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, झहीर खान, हरभजन सिंग आणि रवीचंद्रन अश्विनही उपस्थित होते. शो दरम्यान सौरव सेहवागला म्हणाला, आमच्या दर्शकांना हे सांगा की जेव्हा मुल्तानमध्ये त्रिशतक ठोकले तेव्हा ९५ धावानंतर सिक्स मारून शतक पूर्ण केले, १९५वर सिक्स मारून द्विशतक पूर्ण केले आणि २९५वर सिक्स मारून त्रिशतक ठोकले. त्यावेळी गोलंदाजी करत होता सकलेन मुश्ताक. फिल्डमध्ये लाँग ऑफ, लाँग ऑन, डीप मिडविकेट आणि डीप स्क्वेअर लेगवर फिल्डर उभा होता. अशात ही रिस्क का घेतली. सिंगल खेळून द्विशतक वा त्रिशतक का पूर्ण केले नाही. 

यावर सेहवाग म्हणाला, जर सिंगल धावा घेतल्या असत्या तर ६ बॉल खेळावे लागले असते. सहा वेळा बाद होण्याचा चान्स असतो. मात्र सिक्स मारल्यास एकाच बॉलवर तुम्हाला ६ धावा मिळतात. तसेच एकदाच बाद होण्याची शक्यता असते. आणखी एक गोष्ट ती म्हणजे जेव्हा तुम्ही २९५ धावांवर खेळत असता तेव्हा तुम्हाला विकेट माहीत असते, बॉलरही माहीत असतो. तेव्हा एक फलंदाज म्हणून तुमचा कॉन्फिडन्स इतका असतो की तुम्हाला जे हवे ते तुम्ही करू शकता. 

यानंतर सेहवागने थोडा विचार करत म्हटले की, १००-१२० धावांच्या स्कोरपर्यंत मी ६ अथवा ७ सिक्स मारले होते.त्यानंतर तेंडुलकरने ते बंद केले. गांगुलीने विचारले बंद केले म्हणजे, सेहवाग म्हणाला, तो म्हणाला, आता जर तु सिक्स मारलास तर तुला येथेच बॅटने मारेन. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी