मुंबई : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सचिन त्याचे मनोरंजक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये शेअर करत असतो. नुकताच सचिनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला चहाचा घोट घेताना दिसत आहे. सचिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Sachin Tendulkar was seen sipping tea on the roadside, video went viral)
अधिक वाचा : sara tendulkarचा हा व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 100 शतके झळकावणारा सचिन तेंडुलकर सध्या सुट्टी एंजाॅय करत आहे. दोन दिवसांपूर्वी तो आणि मुलगा अर्जुन कोल्हापूरातील एका मित्राच्या शेतात मुक्काम ठोकले. तिथे त्याने तांबडा, पांढरा रस्सा आणि मटणा ताव मारला. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता उठून त्यांनी नृसिंहवाडी गाठली, तेथे दत्त दर्शन घेऊन बेळगावमार्गे तो गोव्याला रवाना झाला.
या सुट्ट्यांमध्ये त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला चहा पिताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओमध्ये तो चहासोबत टोस्टचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचवेळी चहा पिल्यानंतर सचिनने दुकानदाराशी खास संवाद साधला आणि त्याच्यासोबत सेल्फी घेताना दिसला.
अधिक वाचा : IND vs BAN: मोहम्मद शमीच्या ऐवजी अर्शदीपला का दिली शेवटची ओव्हर? रोहित शर्माचे हे उत्तर
सचिन तेंडुलकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. सचिन निवृत्तीपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.