सुशील कुमार आणि सागरमधील वादाचे खरे कारण, प्रकरणात नवे वळण, युक्रेनच्या महिलेचे कनेक्शन आले समोर

दिल्लीत छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या सागर धनखड त्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिस टीमला असे वाटते की सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यातील वादामागचे मुख्य कारण युक्रेनची एक महिला होती.

Ukraine woman connection in Sagar murder case
सागर धनखड हत्याकांडात युक्रेनच्या महिलेचे कनेक्शन 

थोडं पण कामाचं

  • दिल्लीतील सागर धनखड हत्याकांडात नवीन गोष्टी समोर
  • दिल्ली पोलिस युक्रनेच्या एका महिलेच्या शोधात
  • पोलिसांना वाटते की महिलेसंदर्भात वादच हत्येमागचे मुख्य कारण

नवी दिल्ली : दिल्लीत छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या सागर धनखड हत्याकांडात (Sagar Murder Case) पोलिस तपास जसाजसा पुढे सरकतो आहे, तसतशी नवीन गोष्टी समोर येत आहेत. या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिस टीमला (Delhi Police) असे वाटते की सुशील कुमार (Sushil Kumar) आणि सागर धनखड (Sagar Dhankhar)यांच्यातील वादामागचे मुख्य कारण युक्रेनची एक महिला (Ukraine Woman) होती. पोलिस सध्या या धाग्याला धरून तपास करत आहेत. पोलिसांना असे वाटते की युक्रेनची ही महिला सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यातील वादाबद्दल अधिक प्रकाश टाकू शकते. या दोन पहिलवानांमधील आणि त्यांच्या गटांमधील वाद इतका विकोपाला का गेला याचा तपास पोलिस करत आहेत. सागर धनखडची हत्या (Sagar Murder) करून सुशील कुमार फरार झाला होता. नंतर त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जेलमध्ये आहे. (Delhi Police thinks, Ukraine woman was the main reason behind the Sagar & Sushil Kumar conflict)

सुशील कुमारच्या फ्लॅटवर यायची ही महिला

एका वृत्तानुसार या महिलेसंदर्भात रहस्य आहे. या महिलेबद्दल अशी माहिती समोर येते आहे की मॉडेल टाऊन स्थित आपल्या फ्लॅटमध्ये सुशील जेव्हा नसायचा तेव्हा ही महिला नेहमी तिथे यायची. या प्रकरणात तक्रार करणारे किंवा संशयित या सर्वांनाच या महिलेच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती नाही. ही महिला सागर धनखड आणि त्याच्या मित्रांची परिचित होती असे सांगण्यात येते आहे.

महिलेबरोबर सेल्फी घेतल्याने भांडण

सागर धनखडच्या हत्येच्या वेळेस ४ मेच्या रात्री सुशील कुमारने महाल आणि अमित या दोघांवरही हल्ला केला होता. या प्रकरणात सुशील कुमारबरोबर अटक झालेला अजय कुमारचे या युक्रेनच्या महिलेवर प्रेम होते, अशी माहिती समोर आली आहे. जेव्हा अजय कुमारने या महिलेबरोबर सेल्फी घेतली होती तेव्हाच पहिल्यांदा या दोन गटात भांडण झाले होते. महालने फ्लॅटवर या महिलेच्या वाढदिवसाची पार्टी दिली होती. याचदरम्यान सुशीलचा मित्र असलेल्या अजयने या महिलेशी असभ्य वर्तन करत सेल्फी घेतल्याची माहिती आहे. या घटनेमुळे महाल नाराज झाला होता. यानंतर सागर आणि महालसह त्यांच्या मिंत्रांनी आधी अजय आणि नंतर सुशील कुमारशी भांडण केले होते. त्यानंतर दोन्ही गटात जोरदार धुमचक्री झाली होती.

अजयनेच सुशील कुमारचे भरले कान

अशी माहिती समोर आली आहे की अजयनेच महाल आणि सागर धनखडच्या विरोधात सुशील कुमारचे कान भरले होते. अजयची इच्छा होती की सुशील कुमारने महाल आणि सागरला धडा शिकवावा, बदला घ्यावा. नीरज बवाना गॅंगसोबत संबंध असलेल्या सुशील कुमारने यानंतर महाल आणि सागरला आपला फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले. फ्लॅट रिकामा करण्यावरून या दोन्ही गटातील वाद वाढतच गेला. सागरने छत्रसाल स्टेडियममधील ५० ते ६० पहिलवानांना दुसऱ्या एका कोचकडे वळवले. याच कोचला सुशील कुमारने छत्रसाल स्टेडियममधून काढले होते. या घटनेमुळे सुशील कुमार आणि सागरमधील वाद आणखी वाढला. त्यानंतर सागर आणि विजेंदरने नांगलोईमध्ये आपला एक आखाडा सुरू केल्याची माहिती आहे. तिथे ते पहिलवानांना प्रशिक्षण द्यायचे. यामुळे सुशील कुमारचा सागरवरील राग आणखी वाढला आणि तो सागरला धडा शिकवण्याची संधी शोधू लागला.

मारहाणीत जखमी होऊन सागरचा मृत्यू

युक्रेनच्या त्या महिलेमुळे या दोन पहिलवानांच्या गटात शत्रुत्व निर्माण झाले. सुशील कुमारे सागरला धडा शिकवण्यासाठी निर्णय घेतला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन सागर, महाल आणि इतर तिघांना त्या रात्री त्यांच्या घरातून उचलले आणि छत्रसाल स्टेडियमवर आणले. तिथे सुशील कुमार आणि त्याच्या गॅंगस्टर मित्रांनी सागर आणि त्याच्या मित्रांना जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीतच सागर धनखडचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी