सुशील कुमारला आणखी ४ दिवस पोलीस कोठडी

कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदके जिंकलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

Sagar Murder case: Olympian Sushil Kumar gets no relief, four days more police remand
सुशील कुमारला आणखी ४ दिवस पोलीस कोठडी 

थोडं पण कामाचं

  • सुशील कुमारला आणखी ४ दिवस पोलीस कोठडी
  • दिल्ली पोलिसांनी सुशीलच्या सात दिवसांच्या कोठडीची केली होती मागणी
  • सुशील कुमारवर हत्येचा आरोप

नवी दिल्ली: कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदके जिंकलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. तसेच दर २४ तासांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. सुशीलच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. पण कोर्टाने पोलीस कोठडीत सुशीलची रवानगी केली. Sagar Murder case: Olympian Sushil Kumar gets no relief, four days more police remand

दिल्ली पोलिसांनी सुशीलच्या सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. 

याआधी सुशीलला २३ मे रोजी अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्याला २९ मे रोजी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आता जून महिन्यात त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाईल. 

सुशील कुमारवर पोलिसांचा आरोप

सागर आणि त्याचे मित्र भाडेपट्टीच्या घरात राहात होते. हे घर रिकामे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. सागर ९७ किलो वजनी गटात ग्रीको रोमन कुस्ती खेळत होता. तो माजी ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियन होता. सीनिअर नॅशनल कँपमध्ये सहभागी झाला होता. त्याला आणि त्याच्या मित्रांना छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये घर रिकामे करण्यासाठी धमकावण्यात आले. यावेळी सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सागर आणि त्याच्या मित्रांना बेदम मारहाण केली. मारहाणीतच सागरचा मृत्यू झाला; असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

सुशील कुमारचे करिअर

भारतासाठी ऑलिंपिकमध्ये सर्वात पहिले कांस्य पदक (ब्राँझ मेडल) महाराष्ट्रातील कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये जिंकले. यानंतर भारतासाठी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या प्रकारात थेट २००८ मध्ये सुशील कुमारने कांस्य पदक जिंकले. नंतर २०१२ मध्ये सुशील कुमारने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. सुशील कुमार हा भारताचा एकमेव कुस्तीपटू आहे ज्याने लागोपाठच्या ऑलिंपिकमध्ये पदक जिंकले. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप पण जिंकली. पण निवड समितीशी झालेल्या वादामुळे सुशील कुमार रिओ ऑलिंपिकमध्ये खेळू शकला नाही. कोरोनामुळे जपानचे टोकिओ ऑलिंपिक होणार की नाही याविषयी अद्याप संभ्रम आहे. मागील काही वर्षात सुशीलला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. यामुळे कुस्तीपटू सुशील कुमारच्या करिअरला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. या अशा वातावरणात हत्येच्या प्रकरणात सुशीलची रवानगी २३ मे २०२१ रोजी पोलीस कोठडीत झाली आणि २९ मे २०२१ रोजी कोर्टाने त्याला आणखी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी