ऑलिंम्पिक विनर टू किलर कसा झाला सुशील कुमार, टोल वसूली ते गॅंगस्टरशी मैत्री, कसे झाले हत्याकांड, 'कोच'चे मत

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 29, 2021 | 18:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

सुशील कुमारची मैत्री फक्त गॅंगस्टर नीरज बवानाबरोबर नव्हती तर काला जठेडीच्या भावाबरोबरदेखील त्याचे चांगले संबंध आहेत. याविषयीचे फोटो आता समोर येत आहेत. भूतकाळात जाऊन सुशील कुमारविषयी जाणून घ्यावे लागेल.

Relations with Gagsters, Toll Plaza contract, Downfall of Sushil Kumar
टोल वसूली ते गॅंगस्टरशी मैत्री, सुशीलकुमारचे पतन 

थोडं पण कामाचं

  • टोल वसूलीचे कंत्राट आणि गॅंगस्टर्स
  • नेमके काय झाले हत्याकांडाच्या दिवशी
  • सुशील कुमारचे कोच विरेंद्र यांचे मत

नवी दिल्ली : सागर धनखड हत्याकांडातील (Sagar Murder Case) मुख्य आरोपी आणि ऑलिम्पिक पदकविजेता पहलवान सुशीलकुमार (Sushil Kumar) संदर्भात नवनवीन माहिती समोर येते आहे. सुशील कुमारची मैत्री फक्त गॅंगस्टर नीरज बवानाबरोबर (Gangster Neeraj Bawana) नव्हती तर काला जठेडीच्या भावाबरोबरदेखील (Jathedi Gang) त्याचे चांगले संबंध आहेत. याविषयीचे फोटो आता समोर येत आहेत. ही सर्व माहिती समोर आल्यानंतर आता हे प्रश्न उभे राहतात की सुशील कुमारची या गॅंगस्टरबरोबर मैत्री (Sushil Kumar's friendship with gangsters) कशी झाली. यासाठी थोडेसे भूतकाळात जाऊन सुशील कुमारविषयी जाणून घ्यावे लागेल. समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीजवळच्या लाडपूर, औचंदी बॉर्डर, कुतुबगड, नाहरा इत्यादी परिसरातील टोल प्लाझांवर टोल वसूलचे कंत्राट (Toll Plaza contract to Sushil Kumar) सुशील कुमारला तीन ते चार वर्षांआधी मिळाले होते. (Sagar Murder Case: Olympic winner to killer, Relations with Gagsters, Toll Plaza contract, Downfall of Sushil Kumar)

टोल वसूलीचे कंत्राट आणि गॅंगस्टर्स


टोल प्लाझावरून टोलची वसूली करण्यासाठी सुशील कुमारने ज्या पहलवानांचे गुंडांशी किंवा गॅंगस्टर्सशी संबंध होते अशांना नोकरीवर ठेवण्यास सुरूवात केली होती. तेव्हापासूनच सुशील कुमारचे गॅंगस्टर्सशी संबंध येण्यास सुरूवात झाली होती. एवढेच नव्हे तर त्या परिसरात आपली दांडगाई दाखवण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी सुशील कुमार उठता बसता गॅंगस्टर्सबरोबर फोटो काढत असे. नंतरच्या काळात सुशील कुमारचे गुंडांशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्याचा तो पुरेपूर वापर करत असे. सागर धनखड हत्याकांडात गॅंगस्टर्सबरोबरच्या सुशील कुमारच्या या मैत्रीचा मोठा हात आहे.

नेमके काय झाले हत्याकांडाच्या दिवशी


ज्या दिवशी सागर धनखडची हत्या झाली त्या दिवशी सुशील कुमारने आपल्या या गॅंगस्टर्स मित्रांना बोलावले होते. सुशील कुमारचा साथीदार अजयने फोन करून नीरज बवाना आणि काला असौडा गॅंगच्या गुंडांना बोलावले. त्यावेळेस एकूण ७ गुंड आले होते. यातील ५ गुंडांना अटक करण्यात आली आहे.  पोलिस तपासात भूपेंद्र, मंजीत, गुलाब आणि मोहित या चार आरोपींची चौकशी केल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. फोन आल्यानंतर हे सर्व गुंड त्या दिवशी छत्रसाल स्टेडिअमध्ये पोचले होते. त्यावेळेस तिथे सुशील कुमार आणि त्याचे काही पहलवान साथीदार रविंद्र उर्फ भिंडा याला मारहाण करत होते. ही मारहाण छत्रसाल स्टेडिअमच्या आत होत होती. रविंद्रला सागर कुठे आहे हे विचारले जात होते. रविंद्र मार खात होता मात्र सागरचा पत्ता सांगत नव्हता. यानंतर रविंद्रच्या मोबाईलवर कोणाचातरी फोन आला. तो फोन कॉल सुशील कुमारचा साथीदार अजय याने घेतला. त्यानंतर सर्वच लोक पत्ता मिळाला असे म्हणत ओरडायला लागले. 
त्यानंतर कारमध्ये बसून तीन गुंड मॉडेल टाऊन येथे पोचले. सागर तिथे भाड्याच्या घरात राहत होता. 

छत्रसाल स्टेडिअममध्ये काय झाले


हे सर्व गुंड तिथे रात्री १२ ते १ च्या दरम्यान पोचले होते. सुशील आणि अजयदेखील दुसऱ्या कारने तिथे पोचले. सुशील कुमार कारमध्येच खाली थांबला. तीन गुंड सागरच्या घराचे गेट तोडत घरात घुसले. त्यावेळेस घरात तीन लोक होते. सागर, सोनू आणि अमित हे तिघेही पत्ते खेळत बसले होते. सुशील कुमारच्या गुंडांनी सोनूला खूप मारहाण केली आणि सागरलादेखील मारहाण करत सुशील कुमारकडे घेऊन गेले. त्यानंतर हे सर्व सागरला घेऊन छत्रसाल स्टेडिअमवर (Chhatrasal Stadium Murder) पोचले आणि तिथे नेऊन सागरला लाठ्या काठ्यांनी जोरात मारहाण करायला सुरूवात केली. याच दरम्यान रविंद्र तिथून निसटला आणि त्याने १०० नंबरवर कॉल केला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले. मात्र त्यावेळेस छत्रसाल स्टेडिअमचे गेट बंद होते. पोलिसांना आत जाण्यास १५ मिनिटे लागली. पोलिसांच्या सायरनच्या आवाजानंतर स्टेडिअमचे गेट उघडले. यादरम्यान सर्व गुंड आणि सुशील कुमार फरार झाले, फक्त एक गुंड प्रिन्स हा घटनास्थळी पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्याकडे पिस्तूलदेखील होते. सोनू आणि अमित गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर अवस्थेतील सागरलादेखील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

सुशील कुमारचे कोच विरेंद्र यांचे मत (Sushil Kumar's coach Virendra)


सुशील कुमारचे पहलवानीतील कोच विरेंद्र यांनीदेखील छत्रसाल स्टेडिअममधील हत्याकांडासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्टेडिअममध्ये नेमके काय घडले ते आपल्याला माहित नाही मात्र त्यामुळे खेळ आणि देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, असे ते म्हणाले. विरेंद्र जवळपास २० वर्षांपासून छत्रसाल स्टेडिअमशी जोडले गेलेले आहेत. सध्या ते दिल्लीच्या बाहेरील नरेला नावाच्या परिसरात एक आखाडा चालवतात. तिथे ते २०० पहलवानांना कुस्तीचे डावपेच शिकवतात. १९८८ मध्ये ते छत्रसाल स्टेडिअममध्ये विद्यार्थी म्हणून भरती झाले होते. त्यानंतर पाचच वर्षांनी म्हणजे १९९३ मध्ये ११ वर्षांचा सुशील छत्रसाल स्टेडिअममध्ये दाखल झाला होता. २००० नंतर विरेंद्र पहलवानीचे कोच झाले त्यानंतर सुशील कुमारदेखील त्यांचा विद्यार्थी झाला होता. विरेंद्र यांनी सुशील कुमारला कुस्तीचे डावपेच शिकवले होते. विरेंद्र यांनादेखील पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. सुशील कुमारचा कोणाकोणाशी संबंध होता यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना बोलावले होते. पदकं जिंकल्यानंतर सुशील कुमारचे विरेंद्र यांना भेटणे कमी झाले होते. मागील २ वर्षांपासून दोघांचाही संपर्क तुटला होता. सागर आणि सुशील कुमार दोघेही चांगले पहलवान असल्याचे विरेंद्र यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी