Sakshi Malik: या कारणामुळे साक्षी मलिकला बजावली कारणे दाखवा नोटीस

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 20, 2019 | 13:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी नावे पाठविण्याची शेवटची तारीख १५ऑगस्ट होती. डब्ल्यूएफआयने ऑलिम्पिकमध्ये नसलेल्या वजनी गटासाठी प्रवेशिका १९ ऑगस्टपर्यंत पाठवायची होती. महिला खेळाडूंच्या चाचण्या लखनऊमध्ये घेणार आहे.

Sakshi Malik
साक्षी मलिक  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • साक्षी मलिकला राष्ट्रीय शिबिर सोडल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस
 • शिबिरातून २५ खेळाडूंची हकालपट्टी
 • सुशील कुमारची ७४ किलो वजनी गटासाठी उद्या होणार चाचणी

Wrestling Federation India : ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) परवानगी न घेता राष्ट्रीय शिबिर सोडल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लखनऊ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात सुरू असलेल्या शिबिरातील ४५ पैकी २५ महिला कुस्तीपटूंनी कोणतीही परवानगी न घेता शिबिरातून बाहेर पडल्या आहेत. शिबिरातून २५ खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक (६२किलो), सीमा बिस्ला (५० किलोग्राम) आणि किरण (७६ किलोग्राम) या तीन स्पर्धकांचाही समावेश आहे. या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे उत्तर सादर करण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट (बुधवार) पर्यंत आहे.

इतर सर्व खेळाडूंना डब्ल्यूएफआयच्या पुढच्या आदेशापर्यंत राष्ट्रीय शिबिरातून हद्दपार करण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये नसलेल्या चार खेळाडूंना चाचणीसाठी सहभागी होता येणार नाही. डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्या मते, भारतीय संघातील खेळाडू सराव स्पर्धांसाठी बेलारुस आणि इस्टोनिया येथे रवाना झाल्यावर उरलेल्या खेळाडूंनी शिबिरातून बाहेर जाण्याचे ठरविलं होतं. यासाठी इतर खेळाडूंनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

आम्ही साक्षी, सीमा आणि किरण या तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बुधवारपर्यंत त्यांनी उत्तर द्यायचे आहे. इतर खेळाडूंना विचारण्याची तसदीही घेतलेली नाही. त्यांना फक्त बेशिस्तीच्या कारणास्तव त्यांना शिबिरातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना शिबिरात पुन्हा बोलवायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. शिबिर अजून सुरू असून त्यात काही कुस्तीपटू आणि ज्युनियर खेळाडू आहेत. ज्या खेळाडूंना हद्दपार करण्यात आले आहे, ते खेळाडू आता काही कारणे सांगितलं. माझी आई आजारी आहे म्हणून मी शिबिरातून बाहेर पडलो आणि मी याबद्दलची माहिती तुम्हाला दिली होती असंही खोट सांगितलं, पण चुका मान्य करणार नाहीत. असं तोमर यांनी म्हणाले.

साक्षी, सीमा आणि किरण या तिघींचीही स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. आता या तिघींना स्पर्धेमध्ये भाग घेता येईल का ? असं तोमर यांना विचारलं असता त्यांनी 'मी यावर आता बोलू शकत नाही. फेडरेशन यावर निर्णय घेईल.' असं सांगितलं. डब्ल्यूएफआयच्या सूत्रांनी सांगितले की, या तिन्ही खेळाडूंना कडक शब्दात समजवण्यात येईल. डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, जे खेळाडू गंभीरपणे सराव करतील तेच या शिबिरात हवेत आहेत. ज्यांना घरच्या समस्या असतील तर त्यांनी घरीच राहावं. त्या खेळाडूंऐवजी इतर खेळाडूंना संधी देऊ. काही खेळाडूंमुळे शिबिरावर परिणाम होऊ दिला जाणार नसल्याचं सिंह यांनी पीटीआयला सांगितले. डब्ल्यूएफआयने चाचणी न घेता युनायटेड वर्ल्ड रेसलिंगला (यूडब्ल्यूडब्ल्यू) वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी एन्ट्री पाठवून चाचण्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाबद्दल विचारले असता तोमर यांनी नावे पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट होती. तर ऑलिम्पिकमध्ये नसलेल्या वजनी गटासाठी प्रवेशिका १९ ऑगस्टपर्यंत पाठवायची होती. पुरुष खेळाडूंनच्या चाचण्या उद्या नवी दिल्लीत होणार आहेत. असा निर्णयाचा बचाव केला.


 स्पर्धेसाठी आम्ही एक संघ  बेलारुस, इस्टोनियाला पाठवला आहे. काही ज्युनियर खेळाडूंना चाचणीत सहभागी व्हायचं होते. त्यासाठी आम्ही चाचणी घेणार आहोत, जेणेकरून त्या स्पर्धकांनाही भाग घेता येईल. ९२ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू विकीला ही या स्पर्धामध्ये भाग घ्यायचा आहे. गुणवत्ता ओळखता यावी म्हणून आम्ही उशीरा चाचणी घेतली. शिस्तभंगाच्या कृतीमुळे महिलांच्या खेळाडूंच्या चाचण्या अत्यंत कमकुवत झाल्या आहेत, हे मी मान्य करतो. आम्ही आधीच यूडब्ल्यूडब्ल्यूला नावे पाठविले आहेत. आम्ही वैद्यकीय प्रमाणपत्र देऊ शकतो, असं तोमर म्हणाले. दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमारची ७४ किलो वजनी गटासाठी  उद्या चाचणी होणार आहे. 
 

राष्ट्रीय शिबिरातून हद्दपार झालेल्या कुस्तीपटूंची नावे:

 1. ५० किलो वजनी गट : इंदू चौधरी, प्रीती, शीतल तोमर
 2. ५३ किलो वजनी गट : सीमा, कीमती, रमण यादव
 3. ५५ किलो वजनी गट : पिंकी
 4. ५७ किलो वजनी गट : पिंकी राणी
 5. ५९ किलो वजनी गट : मंजू, अंकिता, राणी राणा
 6. ६२ किलो वजनी गट : साक्षी मलिक, रचना, पूजा
 7. ६५ किलो वजनी गट :  अनिता, गार्गी यादव, रितु मलिक
 8. ६८ किलो वजनी गट : रजनी, नैना, कविता
 9. ७६ किलो वजनी गट : किरण, ज्योती, सुदेश, पूजा, राणी.
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...