श्रीलंकेच्या क्रिकेटचे भवितव्य भारताच्या हाती असल्याची चर्चा, जयसूर्याने घेतली जय शहांची भेट

sanath jayasuriya meet jay shah : श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याने भारतात बीसीसीआयचे सचिव आणि एशियन क्रिकेट काउंसिलचे चेअरमन जय शहा यांची भेट घेतली.

sanath jayasuriya meet jay shah
जयसूर्याने घेतली जय शहांची भेट 
थोडं पण कामाचं
 • श्रीलंकेच्या क्रिकेटचे भवितव्य भारताच्या हाती असल्याची चर्चा
 • जयसूर्याने घेतली जय शहांची भेट
 • जयसूर्याने ट्वीट करून दिली भेटीची माहिती

sanath jayasuriya meet jay shah : श्रीलंका हा देश आर्थिक संकटातून जात आहे. या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम श्रीलंकेतील क्रीडा आणि मनोरंजन सृष्टीवरही झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याने भारतात बीसीसीआयचे सचिव आणि एशियन क्रिकेट काउंसिलचे चेअरमन जय शहा यांची भेट घेतली. या भेटीची माहिती जयसूर्याने ट्वीट करून दिली. । क्रीडा / क्रिकेटकिडा 

यूएईमध्ये शनिवार २७ ऑगस्ट २०२२ पासून एशिया कप टी २० क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत २७ तारखेला अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका ही पहिली मॅच दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मॅचला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असताना जयसूर्याने जय शहा यांची भेट घेतली. या भेटीत श्रीलंकेतील क्रिकेटबाबत चर्चा झाली. यानंतरच श्रीलंकेच्या क्रिकेटचे भवितव्य भारताच्या हाती असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

जय शहा यांना भेटणे ही सन्मानाची आणि आनंदाची बाब असल्याचे जयसूर्याने ट्वीटमध्ये नमूद केले आहे. भारत दौऱ्यावर असलेल्या जयसूर्याने गांधींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. या भेटीत त्याने चरख्यावर बसून सूत कातले. गांधींच्या आश्रमात विनम्रतेची अनुभुती घेतली, गांधींची जीवनगाथा आजही प्रेरणादायी आहे अशा स्वरुपाचे ट्वीट जयसूर्याने केले. जयसूर्याने मल्याळम सिनेमातील दिग्गज अभिनेता मामूट्टी (Mammootty) याची भेट घेतली. । क्रीडा / क्रिकेटकिडा 

याआधी श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षा (Gotabaya Rajapaksa) यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यांवर मोठी आंदोलनं झाली. यावेळी श्रीलंकेचे अनेक क्रिकेटपटू या आंदोलनांना समर्थन देत होते. सनथ जयसूर्या, कुमार संघकारा, महेला जयवर्धने यांनी जाहीरपणे आंदोलनांना समर्थन दिले होते.

आशिया कप टी २० क्रिकेट स्पर्धा २०२२, यूएई

अ गट : भारत आणि पाकिस्तान
ब गट : अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका
सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार

 1. शनिवार २७ ऑगस्ट २०२२ श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
 2. रविवार २८ ऑगस्ट २०२२ भारत विरुद्ध पाकिस्तान
 3. मंगळवार ३० ऑगस्ट २०२२ बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
 4. बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ भारत विरुद्ध जाहीर होईल
 5. गुरुवार १ सप्टेंबर २०२२ श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
 6. शुक्रवार २ सप्टेंबर २०२२ पाकिस्तान विरुद्ध जाहीर होईल
 7. शनिवार ३ सप्टेंबर २०२२ सुपर ४ साठीचा सामना, जाहीर होईल
 8. रविवार ४ सप्टेंबर २०२२ सुपर ४ साठीचा सामना, जाहीर होईल
 9. मंगळवार ६ सप्टेंबर २०२२ सुपर ४ साठीचा सामना, जाहीर होईल
 10. बुधवार ७ सप्टेंबर २०२२ सुपर ४ साठीचा सामना, जाहीर होईल
 11. गुरुवार ८ सप्टेंबर २०२२ सुपर ४ साठीचा सामना, जाहीर होईल
 12. शुक्रवार ९ सप्टेंबर २०२२ सुपर ४ साठीचा सामना, जाहीर होईल
 13. रविवार ११ सप्टेंबर २०२२ अंतिम सामना, जाहीर होईल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी