Wimbledon 2022: सानिया मिर्झाची विम्बल्डनमध्ये धमाल सुरूच, मिक्स डबल्सच्या सेमीफायनलमध्ये 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 05, 2022 | 12:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

sania mirza wimbledon: सानिया मिर्झा आणि मेट पेविक जोडीने विम्बल्डनच्या क्वार्टरफायनलमध्ये गॅब्रिएला डाब्रॉस्की आणि जॉन पीअर्स जोडीला ६-४, ३-६, ७-५ने हरवले. सानिया पुढील वर्षी निवृत्त होतेय. 

sania mirza
सानिया मिर्झाची विम्बल्डनमध्ये धमाल, मिक्स डबल्स सेमीफायनल 
थोडं पण कामाचं
  • सानिया मिर्झाची जोडी मिक्स डबल्सच्या अंतिम ४मध्ये 
  • २०२२नंतर निवृत्ती घेणार सानिया

मुंबई: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाचे(sania mirza) विम्बल्डनमध्ये(wimbledon) जबरदस्त प्रदर्शन सुरू आहे. तिने आपला क्रोएशियाचा पार्टनर मेट पेविक(met pevic)सोबत मिक्स डबल्सच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सानिया आणि पेटची जोडी या स्पर्धेतील सहावी सीड आहे. या जोडीने क्वार्टर फायनलमध्ये चौथ्या सीडेड गॅब्रिएला डॉब्रॉस्की आणि जॉन पीअर्स जोडीला चांगलीच मात दिली. सोमवारी खेळवण्यात आलेल्या या सामन्यात सानिया आणि मेटच्या जोडीने प्रतिस्पर्ध्यांना ६-४, ३-६, -५ असे हरवत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले. sania mirza and her Croatian partner Mate Pavic reach in semifinal of wimbledon mixed doubles

अधिक वाचा - घरात सिनेमांचं वातावरण असूनही अपयशी ठरला सुजैनचा भाऊ

सानिया २०२२ नंतर होणार निवृत्त

सानिया मिर्झाने आदीच ही घोषणा केली होती की हे २०२२ हे वर्ष तिच्या कारकिर्दीतील शेवटचा हंगाम आहे. ानंतर ती निवृत्त होणार आहे. सानिया आणि मेटचा पुढील सामना रोबर्ट फराह आणि जेलेना ओस्ताफेंको अथवा दुसरी सीडेड नॅल स्कुप्सी आणि डेसिरॅ क्रॉक्जिकशी होईल. 

दुसऱ्या राऊंडमध्ये सानियाच्या जोडीला मिळाला वॉकओव्हर

सानिया आणि मेटची जोडी जबरदस्त कामगिरी करत आहे. जर ही जोडी पहिली सर्व्हिस करते तर ७३ टक्के जिंकण्याची शक्यता असते मात्र दुसरी सर्व्हिस केल्यास जिंकण्याची शक्यता कमी होऊन ६५ टक्क्यांवर येते. या जोडीला दुसऱ्या राऊंडमध्ये फायदा मिळाला होता जेवहा त्यांचा सामना इवानन डोडिग आणि लतिशा चैन यांच्या जोडीशी होणार होता. मात्र ही जोडी बाहेर केली तेव्हा सानिया-मेट जोडीला वॉकओव्हर मिळाला. 

अधिक वाचा - या बियांमुळे एका महिन्यात होईल वजन कमी

२०१५मध्ये सानियाला महिला डबल्समध्ये हा खिताब जिंकला होता. मात्र या प्रकारात ती पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर पडली. दरम्यान, मिक्स डबल्सच्या सेमीफायनलमध्ये पोहोचत तिचा हा प्रवास सुरू आहे. दुसरीकडे फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा रोहन बोपण्णा सध्याच्या विम्बल्डनमधून बाहेर पडला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी