Sania Mirza Retirement: Sania Mirzaने केली निवृत्तीची घोषणा, २०२२ हा शेवटचा हंगाम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 19, 2022 | 16:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

sania announces retirement: भारताची टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन खेळ्यासाठी पोहोचलेल्या सानिया मिर्झाचे म्हणणे आहे की हा हंगाम तिचा शेवटचा हंगाम असेल. 

sania shoaib
Sania Mirzaने केली निवृत्तीची घोषणा, २०२२ हा शेवटचा हंगाम 
थोडं पण कामाचं
  • टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झा घेणार निवृत्ती
  • ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानियाचा पराभव

मुंबई: भारताची टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाने(india tennis star sania mirza) खेळातून निवृत्तीची(retirement announce) घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन(australian open) खेळण्यासाठी पोहोचलेल्या सानिया मिर्झाचे म्हणणे आहे की हा तिचा शेवटचा हंगाम असणार आहे. म्हणजेच २०२२मध्ये सानिया मिर्झा शेवटची टेनिस कोर्टमध्ये दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये झालेल्या सामन्यात बुधवारी सानिया मिर्झाला पराभवाचा धक्का बसला. यानंतर तिने हे विधान केले आहे. सानिया मिर्झाचे म्हणणे आहे की हा हंगाम तिचा शेवटचा असणार आहे. ती प्रत्येक दिवशी पुढची तयारी करत आहे. मात्र हे नक्की नाही की ती संपूर्ण हंगाम खेळेल की नाही. sania mirza announces retirement, 2022 will be last season

सामन्यानंतर सानिया मिर्झा म्हणाली, मला वाटते की मी आणखी चांगली खेळू शकते. मात्र आता शरीर त्यापद्धतीने साथ देत नाही. हा माझ्यासाठी मोठा सेटबॅक आहे. २००३ पासून आंतरराष्ट्रीय टेनिस सामने खेळत असलेली सानिया मिर्झा दोन दशकानंतर कोर्टाला अलविदा म्हणणार आहे. 

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभव

भारताच्या रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांनी बुधवारी आपल्या पहिल्या गटातील सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडले. सानिया आणि युक्रेनची तिची जोडीजार नादिया किचनोक यांचा स्लावानियाची तमारा जिदानसेक आणि काजा जुवान यांच्या जोडीने एक तास ३७ मिनिटे चाललेल्या लढतीत ४-६, ६-७(५)पराभव झाला. 

तर बोपण्णा आणि सानिया यांच्या मिश्र दुहेरी गटात आपले नशीब आजमवणार आहेत. बोपन्नाने क्रोएशियाचा दारिया जुराक श्रायबर तर सानियाने अमेरिकाच्या राजीव रामसोबत जोडी बनवली आहे. 

भारतात महिला टेनिसची सगळ्यात मोठी स्टार

३५ वर्षीय सानिया मिर्झा भारतातील सगळ्यात मोठी महिला टेनिस स्टार आहे. तिने अनेक पुरस्कार आपल्या नावे केली आहेत. मात्र त्यासोबतच मुलींच्या पुढच्या पिढीला प्रेरणा दिली आहे. सानिया मिर्झाने डबल्समध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, अमेरिकन ओपनचा खिताब जिंकला आहे. तर मिक्स डबल्समध्येही सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपनचा खिताब जिंकला आहे. 

टेनिस कोर्टशिवाय सानिया मिर्झा सातत्याने चर्चेत राहत असते. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न असो अथवा करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये कधी राष्ट्रगीतावरून झालेला वाद असो वा कपड्यांवरून केलेले विधान असो ती नेहमीच चर्चेत राहत असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी