Wimbledon 2022, Sania Mirza: शेवटचे विम्बल्डन खेळत असलेली सानिया मिर्झा दुसऱ्या फेरीत दाखल

Sania Mirza cruise into second round of mixed doubles in her last Wimbledon campaign, Sania Mirza And Mate Pavic Enter In Second Round Of Wimbledon Mixed Doubles : भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा (३५) यंदा करिअरमधील शेवटची विम्बल्डन टेनिस स्पर्धा खेळत आहे.

Sania Mirza And Mate Pavic Enter In Second Round Of Wimbledon Mixed Doubles
शेवटचे विम्बल्डन खेळत असलेली सानिया मिर्झा दुसऱ्या फेरीत दाखल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सानिया मिर्झा (३५) यंदा करिअरमधील शेवटची विम्बल्डन टेनिस स्पर्धा खेळत आहे
  • सानिया मिर्झा आणि मेट पॅव्हिक ही जोडी विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीच्या प्रकारात दुसऱ्या फेरीत दाखल
  • महिला दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव झाल्यावर सानिया मिर्झा भावूक

Sania Mirza cruise into second round of mixed doubles in her last Wimbledon campaign, Sania Mirza And Mate Pavic Enter In Second Round Of Wimbledon Mixed Doubles : भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा (३५) यंदा करिअरमधील शेवटची विम्बल्डन टेनिस स्पर्धा खेळत आहे. सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा मेट पॅव्हिक ही जोडी विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीच्या प्रकारात दुसऱ्या फेरीत दाखल झाली. पहिल्या फेरीत सानिया-मेटच्या जोडीने स्पेनचा डेव्हिड व्हेगा हर्नांडेझ आणि रशियाची नटेला झालामिद्झे (David Vega Hernandez and Natela Dzalamidze) या जोडीचा ६-४, ३-६, ७-६ (३) असा पराभव केला. याआधी सानिया मिर्झा आणि चेक रिपब्लिकची (Czech Republic) लुसी हेराडेका (Lucie Hradecka) या दोघींची जोडी दुहेरीच्या पहिल्याच फेरीत हरली. 

महिला दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव झाल्यावर सानिया मिर्झा भावूक झाली. काही वेळा खेळाव्यतिरिक्त इतर जबाबदाऱ्यांनाही प्राधान्य द्यावे लागते, असे सानिया मिर्झा म्हणाली. जवळच्या व्यक्तींशी बोलून आणि त्यांना विश्वासात घेऊन विम्बल्डन संदर्भातला कटू निर्णय घेतल्याची माहिती सानियाने दिली. 

सानिया मिर्झाने २०१५ मध्ये मार्टिना हिंगिस सोबत खेळत पहिल्यांदा विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीची स्पर्धा जिंकली होती. या यशानंतर सानियाच्या कामगिरीत चढउतार दिसून आले. आता पस्तिशीच्या सानियाने २०२२ ची स्पर्धा खेळल्यानंतर विम्बल्डनमधून कायमची निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी