घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाच्या या पोस्टने खळबळ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 08, 2022 | 15:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर येत आहे. सानिया मिर्झाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना लिहिले की तुटलेले हृदय कुठे जाते? अल्लाहला भेटण्यासाठी. 

sania mirza
घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाच्या या पोस्टने खळबळ 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार शोएब मलिकने एका टीव्ही शोदरम्यान सानिया मिर्झाला कथितपणे धोका दिला.
  • पाकिस्तानी मीडियाने असाही दावा केला आहे की हे दाम्पत्य वेगळे झाले असून गेल्या काही काळापासून वेगळे राहत आहे.
  • दरम्यान, याबाबत दोघांनीही कोणतीही कमेंट केलेली नाही. 

मुंबई: सानिया मिर्झा(sania mirza) आणि शोएब मलिक(shoaib malik) यांच्यात सगळं काही आलबेल नाही आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. सानिया मिर्झाने सोशल मीडियाव() प्लॅटफॉर्मरर एक पोस्ट शेअर केली आहे यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सानियाने इन्स्टा स्टोरीवर(insta story) पोस्ट शेअर करताा लिहिले की तुटलेली हृदये कुठे जातात? अल्लाहला शोधण्यासाठी जेव्हापासून सानियानेे ही पोस्ट केली आहे तेव्हापासून तिचे चाहते सातत्याने कमेंट करत आहेत. दरम्यान, याबाबत शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. sania mirza new instagram story post viral on social media

अधिक वाचा - मराठमोळ्या पेहरावात सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेंची भेट

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार शोएब मलिकने एका टीव्ही शोदरम्यान सानिया मिर्झाला कथितपणे धोका दिला. पाकिस्तानी मीडियाने असाही दावा केला आहे की हे दाम्पत्य वेगळे झाले असून गेल्या काही काळापासून वेगळे राहत आहे. तसेच असेही सांगितले जात आहे की हे जोडपे केवळ आपला मुलगा इजहानला सांभाळण्याच्या भूमिकेत फक्त एकत्र येतील. दरम्यान, याबाबत दोघांनीही कोणतीही कमेंट केलेली नाही. 

नुकताच साजरा केला इजहानचा बर्थडे

2010मध्ये सानिया मिर्झाने शोएब मलिकशी लग्न केले होते. दोघांना चार वर्षांचा मुलगा इजहानही आहे. नुकतीच त्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टीही ठेवण्यात आली होती आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. 

अधिक वाचा - केशर अस्सल आहे की बनावट?

आधीही केली होती अशाच प्रकारची पोस्ट

इतकंच नव्हे तर सानिया मिर्झाने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खळबळ उडाली हती. सानियाने मुलगा इजहानसोबतचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की ही वेळ आहे जी मला कठीण दिवसांतून बाहेर येण्यास मदत करते.

दरम्यान, सानिया आणि शोएब यांच्यात आलबेल नसल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.  यावरून काही चाहते तिला ट्रोल करत आहेत. खरंतर सुरूवातीलाच सानियाने जेव्हा शोएबशी लग्नाचा निर्णय घेतला होता तेव्हा तिच्यावर प्रचंड प्रमाणात टीका झाली होती. मात्र त्यानंतरही तिने शोएबशी लग्न केले आणि गेल्या 10 वर्षांपासून ते एकत्र राहत होते. मात्र आता त्यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी