शोएब-सानियाच्या संसारात या मॉडेलने लावली आग?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 11, 2022 | 17:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shoaib Malik-Sania Mirza: काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यातील घटस्फोटासाचेकारण मॉडेल आयेशा उमर आहे. शोएबने एक वर्षांपूर्वी आयेशासह बोल्ड फोटोशूट केले होते.

sania shoaib
शोएब-सानियाच्या संसारात या मॉडेलने लावली आग? 
थोडं पण कामाचं
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार शोएब मलिक आणि आयेशा उमर यांनी गेल्या वर्षी बोल्ड फोटोशूट केले होते.
  • या फोटोशूटदरम्यान आयेशा आणि शोएब यांची मैत्री झाली जी लवकरच प्रेमांत रूपांतरित झाली.
  • एबने काही दिवसांपूर्वी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की फोटोशूटदरम्यान आयेशाची त्याला खूप मदत झाली.

मुंबई: पाकिस्तानी क्रिकेटर(Pakistani cricketer) शोएब मलिक(shoaib malik) आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा(indian tennis star sania mirza) यांचे वैवाहिक आयुष्य(married life) सध्या चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की शोएब आणि सानिया यांच्यात घटस्फोट झाला आहे आणि हे दोघेही सध्या वेगवेगळे राहत आहेत. शोएब आणि सानिया यांच्यातील घटस्फोटांच्या चर्चेने चाहते आणि कुटुंबीय त्रस्त झाले आहेत.sania mirza-shoaib mailk divorced due to this model?

अधिक वाचा - सिद्धांत वीर सूर्यवंशी जिममध्ये वर्कआउट करताना कोसळला

या दोघांनी 2010 मध्ये लग्न केले होते आणि आनंदाचे आयुष्य जगत होते. मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनात असे काय घडले ज्यामुळे गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली. यामागचे नक्की कारण अद्याप कोणालाही माहिती नाही मात्र आता असे म्हटले जात आहे की पाकिस्तानी मॉडेल आयेशा उमरमुळे शोएब आणि सानिया मिर्झा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आले. 

आयेशाच्या प्रेमात शोएब असा बुडाला की सानियाची आठवणही आली नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार शोएब मलिक आणि आयेशा उमर यांनी गेल्या वर्षी बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोशूटदरम्यान आयेशा आणि शोएब यांची मैत्री झाली जी लवकरच प्रेमांत रूपांतरित झाली. शोएबने काही दिवसांपूर्वी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की फोटोशूटदरम्यान आयेशाची त्याला खूप मदत झाली. या फोटोशूटदरम्यान शोएब आणि आयेशा यांच्यात मैत्री सुरू झाली आणि दोघांमध्ये प्रेम वाढले. आयेशासोबत्या जवळीकीमुळे शोएब आणि सानिया यांच्यातील दुरावा  वाढला आणि गोष्ट घटस्फोटांपर्यंत आली. 

सानिया-शोएबने घटस्फोटाची अधिकृत घोषणा केलेली नाही

शोएब मलिक आणि सानिया यांच्या जवळच्या व्यक्तीने मीडियाला माहिती दिली की दोघेही आता एकत्र नाहीत आणि त्यांचा घटस्फोट झाला आहे. दरम्यान, सानिया-शोएबने अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केलेली नाही. चाहच्यांचे अद्याप हेच म्हणणे आहे की दोघेही बिघडलेले संबंध सुधारतील आणि यांचे लग्न वाेल. मात्र यांच्या जवळचया व्यक्तीने जो दावा केाला त्यानंतर अनेकांची झोपड उडाली. सानिया मिर्झझाला पाकिस्तानच्या लोकांचा भरपूर सपोर्ट मिळत आहे. आता हे पाहावे लागेल की सानिया-शोएब या घटस्फोटांच्या चर्चेवर कधी बोलतात ते. 

अधिक वाचा - राठोडां सदर्भातला प्रश्न विचारातचं वाघ भडकल्या, म्हणाल्या...

सानियाने केली होती स्टोरी पोस्ट

सानियाने काही दिवसांपूर्वी इन्स्टा स्टोरीवर(insta story) पोस्ट शेअर करताा लिहिले की तुटलेली हृदये कुठे जातात? अल्लाहला शोधण्यासाठी जेव्हापासून सानियानेे ही पोस्ट केली आहे तेव्हापासून तिचे चाहते सातत्याने कमेंट करत आहेत. दरम्यान, याबाबत शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी