Sania-shoaib: सानिया मिर्झाचा मुलगा पडला आजारी, पती शोएबने अचानक घेतला मोठा निर्णय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 22, 2021 | 18:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तानचा शोएब मलिकने आपल्या मुलाच्या आजाराच्या कारणामुळे सोमवारी बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातून हटण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली. 

sania shoaib
सानिया मिर्झाचा मुलगा पडला आजारी, पती शोएबचा मोठा निर्णय 
थोडं पण कामाचं
  • सानिया मिर्झाचा मुलगा आजारी
  • मलिकने अचानक घेतला हा मोठा निर्णय
  • सानिया मिर्झा आणि शोएबची लव्हस्टोरी

ढाका: पाकिस्तानचा वरिष्ठ क्रिकेटर आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाा(sania mirza husband) पती शोएब मलिकने(shoaib malik) मुलाच्या आजाराच्या कारणामुळे अचानक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक आपल्या मुलाच्या आजाराच्या कारणामुळे सोमवारी बांगलादेशविरुद्ध(bangladesh) तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. शोएब मलिकने भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केले आहे आणि या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा इजहान आहे. sania mirza son fall sick, shoaib malik left match against bangladesh

सानिया मिर्झाचा मुलगा आजारी

पीसीबीच्या विधानानुसार शोएब मलिक आपल्या मुलाच्या आजाराच्या कारणामुळे सोमवारी बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात खेळू शकणाार नाही आणि तो सामन्याआधी दुबईला रवाना होत आङे. नुकत्यात संयुक्त अरब अमिराती मध्ये खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनमध्ये पोहोचणारा पाकिस्तानचा संघ या टी-२० मालिकेत २-०ने आघाडीवर आहे. 

मलिकने अचानक घेतला हा निर्णय

पीसीबीने यासोबतच सांगितले की टेस्ट टीमचे सदस्य या सामन्यानंतर चटगावाला रवाना होतील. तर टी-२० संघाचे सदस्य मंगळवारी दुबईच्या रस्त्याने पाकिस्तानला परततील. पाकिस्तान आणि बांगलादेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत दोन सामने खेळवले जातील या मालिकेतील पहिली कसोटी चटगाव आणि तर दुसरी कसोटी ढाका येथे ४ ते ८ डिसेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानिया मिर्झा आणि शोएबची लव्हस्टोरी

एक वेळ अशी होती की देशात इतके तरूण सानिया मिर्झाशी लग्न करण्याचे स्वप्न बघत होते. असं मानलं जात की होती ती एखाद्या भारतीय अभिनेता अथवा क्रिकेटरशी लग्न करेल. मात्र सानियाने शोएबला आपला पार्टनर निवडले. दोघांनी एकमेकांना वेळ दिला आणि लग्नही केले. त्यावेळेस सानियाचा शोराब मिर्झासोबत साखरपुडाही झाला होता. मात्र सानियाने शोएबसोबत लग्न करून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी