Virat Kohli: विराटला एक कसोटी खेळवा आणि बाहेर करा..या दिग्गजाच्या ट्वीटने खळबळ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 21, 2022 | 18:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli Test Career: सोशल मीडियावर एक ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये दिग्गजाने विराट कोहलीला कसोटी संघातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. 

virat kohli
Virat Kohli: विराटला एक कसोटी खेळवा आणि बाहेर करा.. 
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीने वर्ष २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सबीना पार्कमध्ये कसोटी पदार्पण केले होते.
  • २०१२मध्ये कोहली कठीण काळातून जात होता.
  • तेव्हा त्याला ड्रॉप करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

मुंबई: कसोटी क्रिकेटमध्ये(test cricket) विराट कोहलीला(virat kohli) ११ वर्षे पूर्ण झालीत. विराटने या ११ वर्षांत टीम इंडियासाठी(team india) जबरदस्त खेळी केल्या आहेत आणि एक कर्णधार(captain) म्हणूनही तो यशस्वी ठरला आहे. मात्र यातच सोशल मीडियावर(social media) एक ट्वीट व्हायरल(tweet viral) होत आहे. या ट्वीटमध्ये एका दिग्गजाने कोहलीला बाहेर काढण्याची गोष्ट केली आहे. sanjay manjrekar old tweet viral on social media

अधिक वाचा - शुभकार्य ही प्रत्येक वारानुसार करावीत

या ट्वीटने झाली होती खळबळ

विराट कोहलीने वर्ष २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सबीना पार्कमध्ये कसोटी पदार्पण केले होते. २०१२मध्ये कोहली कठीण काळातून जात होता. तेव्हा त्याला ड्रॉप करण्याची मागणी जोर धरू लागली होती. यातच माजी क्रिकेटर संजय मांजरेकरनेही विराटवर सवाल उपस्थित केले होते. आता मांजरेकर यांचे १० वर्ष जुने ट्वीट व्हायरल होत आहे. 

केवळ एक सामना खेळण्याची मिळाली संधी

त्या दिवसांमध्ये कसोटी संघात राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरसारखे दिग्गज खेळत होते. संजय मांजरेकर यांनी ६ जानेवारी २०१२मध्ये केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, मी आताही व्हीव्हीएस लक्ष्मणला ड्रॉप करेन आणि रोहितला पुढील कसोटीत घेईन. दीर्घ योजना पाहता हे योग्य आहे. विराटला आणखी एक कसोटी खेळवा आणि बसवा जेणेकरून विराट कसोटी खेळू शकत नाही याला दुजोरा मिळेल. 

येथे पाहा व्हायरल ट्वीट

अधिक वाचा - घरात पितळेचा सिंह ठेवल्याने संकटे होतील दूर, वाचा सविस्तर

विराट कोहलीचे कसोटी करिअर

विराट कोहलीला वर्ष २०११मध्ये पहिल्यांदा सफेद जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. तो भारतासाठी आतापर्यंत १०१ कसोटी सामने खेळला आहे. कोहलीने या कसोटी सामन्यांमध्ये ७ दुहेरी शतक, २७ शतके आणि २८ अर्धशतकांच्या मदतीने ८०४३ धावा केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी