Sanju Samson Offer:निवड समितीकडून वारंवार डावलल्या जाणाऱ्या संजूला आयर्लंडकडून ऑफर; पण..

Sanju Samson Offer: आयपीएलच्या (IPL) सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद संभाळणाऱ्या संजूला संघातून डावलले जात आहे. संजूला संघात संधी द्यावी, याची मागणी संजूचे चाहते करत आहेत. फिफा विश्वचषकादरम्यानही संजूचे चाहते त्याच्या नावाचे पोस्टर घेऊन कतारला पोहोचले होते, आणि तेथून त्याला पाठिंबा देत होते. मात्र, इतकं होऊनही संजूला टीम इंडियामध्ये (Team India)सतत संधी मिळत नाहीये.

Sanju Samson got offer from Ireland
वारंवार डावलल्या जाणाऱ्या संजूला आयर्लंडकडून ऑफर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संजू सॅमसनने भारताकडून खेळताना 16 टी-20 सामन्यांमध्ये 21.14 च्या सरासरीने आणि 135.15 च्या स्ट्राइक रेटने 296 धावा केल्या आहेत.
  • फिफा विश्वचषकादरम्यानही संजूचे चाहते त्याच्या नावाचे पोस्टर घेऊन कतारला पोहोचले होते.
  • संजू सॅमसनने आयर्लंड क्रिकेट बोर्डाची ऑफर स्वीकारली तर त्याला बीसीसीआयसोबतचा करार संपवावा लागेल.

नवी दिल्ली : बांगलादेशच्या (Bangladesh) विरोधात झालेल्या एकदिवशीय सामन्यातही भारतीय क्रिकेटर संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. निवड समितीकडून (Selection Committee) वारंवार संजूला डावलं जात आहे. आयपीएलच्या (IPL) सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद संभाळणाऱ्या संजूला संघातून डावलले जात आहे. संजूला संघात संधी द्यावी, याची मागणी संजूचे चाहते करत आहेत. फिफा विश्वचषकादरम्यानही संजूचे चाहते त्याच्या नावाचे पोस्टर घेऊन कतारला पोहोचले होते, आणि तेथून त्याला पाठिंबा देत होते. मात्र, इतकं होऊनही संजूला टीम इंडियामध्ये (Team India)सतत संधी मिळत नाहीये. दरम्यान, संजू सॅमसनला आयर्लंडकडून (Ireland) खेळण्याची ऑफर आल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र त्याने ही ऑफर धुडकावून लावली आहे.   (Sanju got offer from Ireland, who repeatedly dropped by the selectors; but...) 

अधिक वाचा  : जाणून घ्या या आठवड्यातील सण अन् उपवास वार
मिळालेल्या माहितीनुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने संजू सॅमसनला म्हणाले की, जर तो आयर्लंडकडून खेळला तर त्याला देशासाठी प्रत्येक सामना खेळण्याची संधी मिळेल. मात्र, सॅमसनने आपल्या कारकिर्दीत आपला देश पुढे ठेवला आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कोणत्याही देशाकडून खेळण्याची आपली इच्छा नसल्याचे त्याने सांगितले. त्याला फक्त भारतीय संघाचा भाग व्हायचे आहे, असं संजू सॅमसननं म्हटलं आहे.  संजू सॅमसनच्या या उत्तरांने करोडो भारतीय नागरिकांचं मन जिंकलं आहे. 

अधिक वाचा  :  मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सहलीच्या बसला अपघात

याआधी विश्वकपसाठी निवडण्यात आलेल्या संघात त्याच्या जागी ऋषभ पंतची निवड करण्यात आली होती. त्यावेळीही चाहते नाराज झाले होते. परंतु संजूच्या उत्तराने अनेकांची मने जिंकली होती. त्यावेळी संजू सॅमसन म्हणाला होता की, पंत त्याच मित्र आहे आणि ते निवडकर्त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. वास्तविक पंतला टी-20 विश्वचषक संघात संधी मिळाली होती. त्यावेळी संजू हा संघाचा भाग नव्हता. यानंतर पंतला प्रचंड ट्रोल करण्यात आले. तेव्हा सॅमसनने त्याला साथ दिली होती.

संजू सॅमसनने भारताकडून खेळताना 16 टी-20 सामन्यांमध्ये 21.14 च्या सरासरीने आणि 135.15 च्या स्ट्राइक रेटने 296 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 66 च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. वारंवार संधी मिळाल्यास संजू चांगली कामगिरी करू शकेल आणि भारताला सामने जिंकून देऊ शकतो. 

संजूने ऑफरने ऑफर का नाकारली असेल बरं? 

जर संजू सॅमसनने आयर्लंड क्रिकेट बोर्डाची ऑफर स्वीकारली तर त्याला बीसीसीआयसोबतचा करार संपवावा लागेल.  तसेच तो आयपीएलमधून बाहेर पडू शकतो. यासोबतच त्याला बीसीसीआयकडून मिळणारा पैसाही गमवावा लागणार आहे. त्याला आयर्लंडकडून क्रिकेट खेळण्यासाठी पैसे मिळतील, पण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयच्या बरोबरीने पगार देणे आयर्लंडच्या आवक्यात नाही. 

अधिक वाचा  : समृद्धी महामार्गावरून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

आयर्लंड क्रिकेट बोर्ड संजूला का देतो ऑफर?

आयर्लंड क्रिकेट बोर्ड अशा खेळाडूच्या शोधात आहेत, जो खेळाडू कर्णधार पद संभाळून संघाला विजय मिळवून देऊ शकतो. दरम्यान संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार राहिला आहे. कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी चांगली झाली आहे. यंदा त्याचा संघही अंतिम फेरीत पोहोचला होता. या कारणास्तव,आयर्लंड क्रिकेट बोर्ड त्याच्यावर विश्वास ठेवत आहे. मात्र या संदर्भात आयर्लंड क्रिकेट बोर्ड किंवा संजू सॅमसनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र सॅमसनला आयर्लंडकडून खेळण्याची ऑफर असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी