Sanju Samson: टी-२० वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसन खेळल्यास कोणाचा पत्ता होणार कट? बीसीसीआयचे हे आदेश

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 13, 2021 | 14:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

सॅमसनने आयपीएलच्या या हंगामात आपल्या आऊटिंगमध्ये सात सामन्यांमध्ये २०७ धावा केल्या. यात त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोर ८२ इतका आहे. 

sanju samson
वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसन खेळल्यास कोणाचा पत्ता होणार कट? 

थोडं पण कामाचं

  • सॅमसनने आयपीएलच्या सध्याच्या हंगामात आपल्या आऊटिंगमध्ये सात सामन्यांमध्ये २०७ धावा केल्यात
  • अटकळींच्या आधारे सॅमसनला पुढील सूचना मिळेपर्यंत यूएईमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.
  • सॅमसनचा संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यात अयशस्वी ठरला मात्र त्याच्या फलंदाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

दुबई: राजस्थान रॉयल्स संघाची आयपीएल २०२१मधील कामगिरी भलेही निराशाजनक असली तरी मात्र कर्णधार संजू सॅमसनच्या फटकेबाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याच कारणामुळे तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे आकर्षित झाला. याच कारणामुळे सॅमसनला पुढील सूचना मिळेपर्यंत यूएईमध्ये राहण्यास सांगितले. 

सॅमसनचा संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यात अयशस्वी ठरला मात्र त्याच्या फलंदाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या अंतिम संघाची घोषणा १५ ऑक्टोबरला होईल.  त्यामुळे या नव्या संघात संजूचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. कार निवडण्यात आलेल्या अनेक खेळाडूंपैकी काही दुखापतग्रस्त आहेत तर काहीजण खराब फॉर्मात आहेत. 

सॅमसनने आयपीएलच्या सध्याच्या हंगामात आपल्या आऊटिंगमध्ये सात सामन्यांमध्ये २०७ धावा केल्यात. यात त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोर ८२ इतका आहे.  तो विकेटकीपर असल्याचाही अधिक फायदा आहे. 

आयपीएलच्या यूएई टप्प्यादरम्यान हार्दिक पांड्या आणि राहुल चाहरसारखे खेळाडूंची कामगिरी चांगली नाही झाली. अटकळींच्या आधारे सॅमसनला पुढील सूचना मिळेपर्यंत यूएईमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याचा संघ ७ ऑक्टोबरला आयपीएलच्या बाहेर झाला होता.

१७ ऑक्टोबरपासून सुरू होतोय वर्ल्डकप

आयसीसी टी-२० वर्ल्डकप येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होतोय. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा फायनल सामना १६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने अधिकृतपणे याचा खुलासा केलेला नाही. आयपीएलची फायनल १५ ऑक्टोबरला होत आहे. त्यानंतर वर्ल्डकप स्पर्धा सुरू होणार आहे. 

टी-२० वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी