मुंबई: वनडे मालिकेत(one day series) क्लीन स्वीप(clean sweap) दिल्यानंतर आता टीम इंडिया(team india) वेस्ट इंडिजविरुद्ध(west indies) रोहित शर्माच्या(rohit sharma) नेतृत्वात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी संघात उप कर्णधार केएल राहुलला सामील करण्यात आले होते मात्र तो मालिका सुरू होण्याआधीच दुखापतग्रस्त झाल्याने संघाबाहेर गेला आहे. आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेत त्याच्या जागी एका स्टार प्लेयरला सामील केले आहे. हा खेळाडू काही बॉलमध्येच सामन्याचे चित्र बदलतो. (sanju samson enter in team india instead of lokesh rahul)
अधिक वाचा - MSBTE डिप्लोमा समर रिझल्ट 31 जुलैपर्यंत
बीसीसीआयने केएल राहुलच्या जागी संजू सॅमसनला संघाचा भाग बनवले आहे. संजू सॅमसन खूप शानदार फॉर्मात आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे की तो काही बॉलमध्ये सामन्याचे चित्र बदलू शकतो. त्याच्याकडे विकेटकीपिंगचेही जबरदस्त स्किल आहे. बीसीसीआयच्या वेबसाईटमध्ये आता निवडलेल्या भारतीय संघामध्ये लोकेश राहुलच्या जागी संजू सॅमसनचे नाव आले आहे.
संजू सॅमसनला निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या वनडे संघात सामील केले होते. मात्र त्याला टी-२० संघात जागा दिली नव्हती. आता लोकेश राहुल बाहेर झाल्याने त्याचे नशीब उघडले आहे. संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध जबरदस्त खेळ केला होता. तसेच आयर्लंड दौऱ्यावरही त्याने आपल्या खेळाने साऱ्यांची मने जिंकली होती.
अधिक वाचा - सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, चांदीदेखील वधारली, ताजा भाव
निवड समितीने संजू सॅमसनला तितक्या संधी दिल्या नाहीत जितक्या ऋषभ पंत आणि इशान किशनला दिल्या. मात्र जेव्हाही संजू सॅमसनला संधी मिळाली त्याने त्याचे सोने केले. संजू सॅमसनने भारतीय संघात २०१५मध्ये पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी १४ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळलेत. या ३ वनडे सामन्यांत त्याने ३७.३३च्या सरासरीन ११२ धावा केल्यात.