IPL 2022: संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या कॅप्टनपदी कायम, राहुल सोडणार पंजाब?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 26, 2021 | 12:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 retain cricketer: क्रिकेटर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी कायम राहणार आहे. तर लोकेश राहुल पंजाब किंग्सला बाय बाय करू शकतो.

sanju samson
IPL 2022: संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या कॅप्टनपदी कायम 
थोडं पण कामाचं
  • संजू सॅमसन २०१८मध्ये ८ कोटी रूपयांना रॉयल्समध्ये सहभागी झाला ोता.
  • संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या कॅप्टनपदावर कायम राहण्यास तयार आहे.
  • त्याला फ्रेंचायझीने १४ कोटी रूपयांना करारबद्ध केले.

मुंबई: आयपीएल २०२२(Ipl 2022)चा मेगालिलाव(mega auction) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्याआधी अनेक फ्रेंचायझी(frenchise) नियमाप्रमाणे खेळाडूंना रिटेन(retain) करत आहेत. दरम्यान, संजू सॅमसन(sanju samson) राजस्थान रॉयल्ससोबत(rajasthan royals) कायम राहणार आहे. तर लोकेश राहुल(lokesh rahul) पंजाब किंग्सचा(punjab kings) संघ सोडू शकतो. क्रिकेटची वेबसाईट क्रिक इन्फोच्या माहितीनुसार संजू सॅमसनला फ्रेंचायझीने रिटेन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सगळ्यात वरच्या स्थानावर ठेवले आहेत. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या कॅप्टनपदावर कायम राहण्यास तयार आहे. त्याला फ्रेंचायझीने १४ कोटी रूपयांना करारबद्ध केले. sanju Samson will be as a captain of Rajasthan royals in ipl 2022

संजू सॅमसन २०१८मध्ये ८ कोटी रूपयांना रॉयल्समध्ये सहभागी झाला ोता. त्याला आयपीएलच्या १४व्या हंगामाचे कर्णधारपदही देण्यात आले होते. दरम्यान, तो संघाला प्लेऑफमध्ये नेऊ शकला नाही. मात्र त्याने आपल्या बॅटने चांगली फलंदाजी करत १३७च्या स्ट्राईक रेटने ४८४ धावा केल्या. 

संजूशिवाय राजस्थान रॉयल्स जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनाही कायम ठेवू शकते. यासोबतच जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांच्यापैकी एकाला फ्रेंचायझी रिटेन करू शकते. 

लोकेश राहुल सोडू शकतो पंजाब

लोकेश राहुल पंजाब किंग्स सोडण्यासाठी तयार आहे आणि नवी फ्रेंचायझी लखनऊ त्याला संघात सामील करू शकते. पांड्या बंधू हार्दिक आणि कृणाल यांना मुंबईने रिटेन केले नाही तर नव्या अहमदाबाद फ्रेंचायझीकडून संपर्क केला जाऊ शकतो. 

दिल्ली कॅपिटल्सकडून रिटेन खेळाडूंच्या नावाची घोषणा

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२२च्या हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावाआधी रिटेन केलेल्या चार खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या हंगामात नेतृत्व करणारा ऋषभ पंत, सलामीवीर पृथ्वी शॉ, ऑलराऊंडर अक्षर पटेल आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्त्याला रिटेन करण्यात आले आहे. श्रेयस अय्यरला रिटेन केले नाही. असं सांगितलं जातयं की स्वत: अय्यरने फ्रेंचायझीला सांगितले होते की त्याला रिटेन व्हायचे नाही. अय्यरने २०२०मध्ये संघाला फायनलला पोहोचवले होते. २०२१च्या हंगामाआधी त्याला दुखापत झाली आणि फ्रेंचायझीने ऋषभ पंतला कर्णधार केले. अय्यरच्या परतण्यानंतरही पंतच कॅप्टनपदी राहिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी