मुंबई: सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर(sachin tendulkar daughter sara tendulkar) आणि शाहरूख खानची फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा सलामी फलंदाज शुभमन गिल(shubman gill) सातत्याने चर्चेत असतात. दोघांच्या गुपचूप रिलेशनच्या अनेक अफवाही सातत्याने समोर येत असतात. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत विधान झालेले नाही.
या दोन्ही स्टार्सनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक एक फोटो शेअर केला आहे. योगायागाची बाब म्हणजे शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर दोघेही या फोटोत एका बीचवर दिसत आहे. साराने जो फोटो शेअर केला आहे त्यात ती एका कारमध्ये बसली आहे आणि साईड मिररला तिचा चेहरा दिसत आहे. तर गिलही बीचवर बसलेला दिसत आहे.
याशिवाय भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर शुभमन गिलने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे यात त्याचे फोटो दिसत आहे. आपल्या फोटोत तो बीचवरील रीथी फारू रिझॉर्ट दिसत आहे. या फोटोंमध्ये तो खूप खुश दिसत आहे. त्यान आपल्या पोस्टमधील कॅप्शनमध्ये लिहिले आहे की...Swipe right to sum up my NY mood
काही दिवसांपूर्वी शुभमन गिल आणि वरूण धवनची भाची अंजनी धवनचा व्हिडिओ समोर आला होता. यात दोघांच्या डिनर डेटबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. याशिवाय सारा तेंडुलकर काही दिवसांपूर्वी लंडनमधून मुंबईला परतली तेव्हा तिला एअरपोर्टवर स्पॉट केले गेले होते आणि एका व्हिडिओत ती डान्स करतानाही दिसत होती.
सचिनची मुलगी सारा तेंडुलकरने हिने नुकताच मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. तिचा एक अॅड व्हिडिओ समोर आला होता त्यात ती अभिनेत्री बनिता संधू आणि तानिया श्रॉफ यांच्यासोबत दिसली होती. याशिवाय तिचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.