मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर(sachin tendulkar daughter sara tendulkar) एक प्रसिद्ध स्टार किड्सपैकी(star kids) एक आहे. साराचे सोशल मीडियावर(social media) मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर(instagram) तिचे २.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती एक आता इंटरनेट सेन्सेशन(internet sensation) बनली आहे. तिने नुकतेच एक फोटोशूट केले. यात ती लेहंग्यामध्ये दिसत आहे. साराने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता डोंगरेसाठी फोटोशूट केले. याचा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. sara tendulkar bridal photo shoot viral on social media
अधिक वाचा - आता महिलांना मिळणार ट्रेनमध्ये कन्फर्म सीट, पाहा कसे
सारा अनिता डोंगरेची ब्राईड लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. लेहंग्याच्या चारही बाजूला हेवी गोल्डन थ्रेडवर्क आहे. विशेष म्हणजे या लेहंग्याच्या बाजूला साईड पॉकेट्स आहेत.
सारा लंडनमध्ये सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती यात ती आणि तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर यांनी मुन्नाभाई आणि सर्किट या बॉलिवूडच्या फेमस जोडीची पोझ दिली होती.
सारा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो टाकला होता. चाहतेही हा फोटो पाहण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. या फोटोत सारा ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
काही दिवसांपू्र्वी साराने मराठमोळा लूक कॅरी केला होता. सचिनचे कुटुंब एका नातेवाईकाच्या लग्नात सामील झाले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. यात सारा अतिशय सुंदर दिसत आहे. सारा तेंडुलकर या लग्नात हातात लग्नाचा कऱ्हा घेऊन उभी होती. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की त्यांच्या अतिशय जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते.
अधिक वाचा - Video: अक्षय कुमारच्या रक्षाबंधन सिनेमाचं नवं गाणं रिलीज
स्टाईल आणि फॅशन याबाबत सारा खूपच सजग असते. त्यामुळेच ती बऱ्याचदा आपल्याला नव्या लूकमध्ये पाहायला मिळते.साराने लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे. साराने आतापर्यंत अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.