sara-arjun: सारा तेंडुलकरला रक्षाबंधनाआधी अर्जुनकडून मिळाले हे गिफ्ट...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 10, 2022 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

sara tendulkar: सारा तेंडुलकरला तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरने रक्षाबंधनाआधी एक खास गिफ्ट दिले आहे. याचा फोटो सारा तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. 

sara tendulkar
सारा तेंडुलकरला रक्षाबंधनाआधी अर्जुनकडून मिळाले हे गिफ्ट... 
थोडं पण कामाचं
  • सारा तेंडुलकरला रक्षाबंधनाआधी अर्जुन तेंडुलकरने गिफ्ट दिले आहे.
  • साराने आपला भाऊ अर्जुनला रक्षाबंधनाच्या या सुंदर गिफ्टबद्दल धन्यवादही म्हटले आहे.
  • सारा तेंडुलकरला गिफ्टमध्ये अर्जुन तेंडुलकरकडून एक हँडबॅग मिळाली आहे.

मुंबई: सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) ची मुलगी सारा तेंडुलकर(Sara Tendulkar) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डान्स व्हिडिओ पोस्ट करत असते. आता रक्षाबंधनाआधी सारा तेंडुलकरला तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरने गिफ्ट दिले आहे. याचा खुलासा साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केला आहे. (sara tendulkar got pre rakhi gift from arjun tendulkar)

अधिक वाचा -  प्राप्तिकरच्या रिफंडची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची,जाणून घ्या

सारा तेंडुलकरला मिळाले हे गिफ्ट

सारा तेंडुलकरला रक्षाबंधनाआधी अर्जुन तेंडुलकरने गिफ्ट दिले आहे. साराने आपला भाऊ अर्जुनला रक्षाबंधनाच्या या सुंदर गिफ्टबद्दल धन्यवादही म्हटले आहे. सारा तेंडुलकरला गिफ्टमध्ये अर्जुन तेंडुलकरकडून एक हँडबॅग मिळाली आहे. ही बॅग साराच्या खांद्यावर दिसत आहे. तर सारा लखनवी कुर्त्यामध्ये सुंदर दिसत आहे. सारा तेंडुलकरने कॅप्शनमध्ये लिहिले की, राखीच्या आधी गिफ्ट साठी खूप थँक्यू माझा छोटा भाऊ अर्जुन तेंडुलकर.

सोशल मीडियावर आहे अॅक्टिव्ह

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती लवकरच आपला बॉलीवूड पदार्पणही करू शकते. सारा तेंडुलकरने नुकतेच कपड्यांच्या एका ब्रँडसाठी मॉडेलिंग केले होते यानंतर ती चर्चेत आली होती. साराने गिफ्टसोबत जो फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे त्यावर चाहते कमेंट करत आहेत. एका युझरने लिहिले की, छान, तर दुसऱ्या युझरने लिहिले, वा क्या बात है. 

अधिक वाचा - उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेल्या आमदाराला मिळालं मोठं गिफ्ट

शुभमन गिलसोबत जोडले गेले नाव

काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या डेंटिंगच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. दरम्यान, गिलने काही दिवसांपूर्वी हा दावा केला होता की तो सिंगल आहे. गिलने आपल्या इन्स्टाग्रामवर लोकांसोबत प्रश्न-उत्तराचे सेशन करत सिंगल असल्याबाबत सांगितले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी