Sara Tendulkar: सारा तेंडुलकरचा पारंपारिक मराठमोळा लूक तुम्ही पाहिलाय का?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 24, 2022 | 13:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

आता साराचा नवा लूक समोर आला आहे. या लूकमध्ये सारा अतिशय मराठमोळा पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. यात तीने नथ, साडी, डोक्यावर चंद्रकोर असा मराठमोळा लूक कॅरी केला आहे. 

sara tendulkar
सारा तेंडुलकरचा पारंपारिक मराठमोळा लूक तुम्ही पाहिलाय का? 
थोडं पण कामाचं
  • सचिनचे कुटुंब एका नातेवाईकाच्या लग्नात सामील झाले होते
  • त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत.
  • सारा तेंडुलकर या लग्नात हातात लग्नाचा कऱ्हा घेऊन उभी होती.

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची(sachin tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर(sara tendulkar) आयपीएल २०२२(ipl 2022)मध्ये सातत्याने चर्चेत राहिलीआहे. या हंगामात मुंबई इंडियन्सची(mumbai indians) कामगिरी खूपच वाईट ठरली मात्र तरीही सारा बऱ्याच सामन्यांमध्ये आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती. ती तिच्या लूक्समुळे बऱ्याचदा चर्चेत असते. आता साराचा नवा लूक समोर आला आहे. या लूकमध्ये सारा अतिशय मराठमोळा पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. यात तीने नथ, साडी, डोक्यावर चंद्रकोर असा मराठमोळा लूक कॅरी केला आहे. sara tendulkar new marathi look viral on social media 

(फोटो साभार - फेसबुक)

सचिनचे कुटुंब एका नातेवाईकाच्या लग्नात सामील झाले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत. यात सारा अतिशय सुंदर दिसत आहे. सारा तेंडुलकर या लग्नात हातात लग्नाचा कऱ्हा घेऊन उभी होती. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की त्यांच्या अतिशय जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. 

(फोटो साभार - फेसबुक)

या लग्नात सारा अतिशय पारंपारिक मराठी वेशभूषेत दिसेत होती. तीने केसाचा अंबोडा बांधून त्यावर गजरा लावला होता. साडी नेसली होती. नाकात नथ होती. कपाळावर चंद्रकोर शोभून दिसत होती. तिला पहिल्यांदा अशा लूकमध्ये पाहिले गेले आहे. 

(फोटो साभार - फेसबुक)

लग्नाच्या इतर कार्यक्रमांमध्ये ती सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. या दरम्यान तिने इतर नातेवाईकांची भेट घेतली. सारा आपल्या शिक्षणामुळे बराच काळ लंडनमध्ये राहिली होती. यावेळेस ती फार कमी वेळा भारतात येत होती. 

(फोटो साभार - फेसबुक)

लग्नात सचिन तेंडुलकरही नवविवाहित जोडप्यासह दिसला. हे लग्न मुंबईच्या के जे डब्लू हॉटेलमध्ये झाले होते. लग्नाचे फोटो फोटोग्राफर समीर वसईकर यांनी फेसबुक पेजवर शेअर केले आहेत.

(फोटो साभार - फेसबुक)

या लग्नात सचिनची आईही सामील झाली होती. संपूर्ण लग्न मराठमोळ्या पद्धतीने पार पडले. लग्नात सचिनने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी