मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर(sachin tendulkar daughter sara tendulkar) सध्या गोव्यामध्ये(goa) एन्जॉय करत आहे. तिचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर(instagram) चांगलेच लोकप्रिय होत आहेत. तिनेच हे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. साराने सुंदर फोटो शेअर करताना खाली कॅप्शनही दिली आहे. यात तिने 'Sunset Walks'असे म्हटले आहे. यात तिच्यासोबत एक कुत्राही दिसत आहे. sara tendulkar new photos share on instagram
साराने फोटो शेअर करताना लोकेशन गोवा असे टाकले आहे म्हणजेच ती गोव्यामध्ये एन्जॉय करत आहे. दुसऱ्या पोस्टमध्येही तिने काही फोटो शेअर केले आहेत. तिने नारंगी रंगाचा ड्रेस घातला आहे.
प्रसिद्ध सिंगर कनिका कपूरनेही साराच्या फोटोंवर कमेंट केली आहे. तिने दिलवाला इमोजी शेअर ेला आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेरनेही कमेंट केली आहे. .
स्टाईल आणि फॅशन याबाबत सारा खूपच सजग असते. त्यामुळेच ती बऱ्याचदा आपल्याला नव्या लूकमध्ये पाहायला मिळते.साराने लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे.
साराने आतापर्यंत अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.