मुंबई: क्रिकेटच्या जगातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्याच्या काळातील सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. साराचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. यातच मुंबईंच्या सांताक्रुझ येथील एका क्लिनिकच्या बाहेर साराला स्पॉट करण्यात आले.
सोशल मीडिया पेज व्हायरल भयानीने शेअर केलेला साराचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोजमध्ये साराने ब्लू जीन्स, ब्लॅक जॅकेट घातले आहे. सोबत खांद्यावर हँडबॅग घेतली आहे. तर एका फोटोत ती कॅमेऱ्याच्या दिशेने हात हलवताना दिसत आहे.
याशिवाय साराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून भाऊ अर्जुन तेंडुलकरलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्याने अर्जुनला आपली आवडती व्यक्ती असल्याचे सांगत त्याला २२व्या वाढदिवसाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
याशिवाय तिने पुढच्या स्टोरीमध्ये तिचा आणि अर्जुनचा लहानपणीचा एक फोटो शेअर करत त्यावर लव्ह यू बिग म असे लिहिले आहे. अर्जुन तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सच्या आयपीएल टीमचा भाग आहे. याशिवाय तो सातत्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळत असत. तो ऑलराऊंडर क्रिकेटर आहे जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये कमाल करू शकतो.
सारा तेंडुलकरबाबत सांगायचे झाल्यास ती सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा भारतीय क्रिकेटर शुभमन गिल आणि तिच्या रिलेशनशिपच्या अफवाही समोर येतात. नुकताच तिचा जिम लूक समोर आला होता.