Ranji Trophy 2022 Final: रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खानचा बोलबाला! फायनलमध्ये शतक ठोकून दुसऱ्या हंगामातही केल्या ९०० पार धावा

Mumbai vs Madhya Pradesh । रणजी ट्रॉफी 2022 मध्ये मुंबईच्या संघातील मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानचा बोलबाला सुरूच आहे. या हंगामातील अंतिम सामन्यातही त्याने दमदार शतक झळकावले आहे.

Sarfaraz Khan scores a century in Ranji Trophy final and scores 900 runs cross in second season
रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खानचा विक्रम, फायनलमध्येही ठोकले शतक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सरफराज खानने फायनलमध्ये शतक ठोकून दुसऱ्या हंगामातही केल्या ९०० पार धावा.
  • फायनलच्या लढतीत मुंबई आणि मध्य प्रदेशचा संघ आमनेसामने आहे.
  • मुंबईच्या संघाने आतापर्यंत ४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे.

Mumbai vs Madhya Pradesh । बंगळुरू : रणजी ट्रॉफी 2022 मध्ये मुंबईच्या संघातील मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानचा बोलबाला सुरूच आहे. या हंगामातील अंतिम सामन्यातही (Final Match) त्याने दमदार शतक झळकावले आहे. त्याच्या शतकाच्या जोरावर मुंबईच्या संघाने पहिल्या डावात ३५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. सरफराज खानचे या हंगामातील हे चौथे शतक आहे. या हंगामात देखील त्याने ९०० हून अधिक धावा केल्या आहेत. (Sarfaraz Khan scores a century in Ranji Trophy final and scores 900 runs cross in second season). 

अधिक वाचा : एक आमदार जरी फुटला तर कायद्याची परवा न करता रस्त्यात तुडवा

सरफराजचा बोलबाला

रणजी ट्रॉफी २०२२ चा फायनलचा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. इथे मुंबई आणि मध्य प्रदेशचे रणजी संघ आमनेसामने आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत मुंबईच्या संघाने ८ गडी गमावून ३५१ धावा केल्या आहेत. मुंबईच्या धावसंख्येमध्ये सरफराजच्या ११९ धावांच्या खेळीचा महत्त्वाचा वाटा आहे. पहिल्या दिवशी तो खेळपट्टीवर आला तेव्हा मुंबईचा संघ १४७ धावांवर ३ बाद अशा स्थितीत होता. यानंतर सरफराजने एक बाजू सांभाळत संघाला मजबूत स्थितीत नेले मात्र दुसऱ्या बाजूने गडी बाद होण्याचे सत्र चालूच होते. मात्र सरफराज अद्याप नाबाद खेळत आहे. 

या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू 

सरफराज खानने या रणजी हंगामातील ६ सामन्यांच्या ८ डावात ९०० हून अधिक धावा केल्या आहेत, त्यामध्ये दोनदा तो नाबाद राहिला आहे. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याची फलंदाजीची सरासरीही १५० च्या वर गेली आहे. या हंगामात त्याने ४ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत. 

४२ व्या किताबावर मुंबईचे लक्ष्य

मुंबईच्या संघाने आतापर्यंत ४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. तर आता अंतिम फेरीत त्यांच्यासमोर असलेल्या मध्य प्रदेशच्या संघाला एकदाही रणजी चॅम्पियन बनण्याची संधी मिळालेली नाही. मध्य प्रदेशचा संघ आतापर्यंत दोनदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. या हंगामापूर्वी मध्य प्रदेशने १९९९ च्या रणजी अंतिम फेरीत धडक मारली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी