Saurabh Tiwari Viral Video : सौरभ तिवारी बॅट घेऊन धावला -चाहत्याच्या अंगावर!

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 05, 2023 | 21:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Saurabh Tiwari Video : सौरभ तिवारी 33 वर्षांच्या या खेळाडूने एके काळी मैदान गाजवलं आहे, मात्र या वेळी सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीयोमुळे तो टीकेचा धनी बनला आहे. 

Saurabh Tiwari does not enjoy receiving hateful remarks from a fan.
धोनीची कॉपी सौरभ तिवारी बॅट घेऊन धावला - चाहत्याच्या अंगावर!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • इतका का चिडला सौरभ तिवारी?
  • ex - captain सध्या काय करतोय?
  • 2008 मध्ये - केलं IPL मध्ये पदार्पण

रांचीः  तुम्ही अशा एखाद्या खेळाडूच नाव सांगू शकाल की, जो टीम इंडियासाठी खेळला आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कधीही बाद झाला नाही? आपण बोलत आहोत ते शानदार फलंदाज सौरभ तिवारी  बद्दल! लांब केसांसाठी आणि एमएस धोनीसारख्या attractive शरीरायष्टीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणजे -  सौरभ तिवारी (Saurabh Tiwari) 33 वर्षांच्या या खेळाडूने एके काळी मैदान गाजवलं आहे, मात्र या वेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे तो टीकेचा धनी बनला आहे. (Saurabh Tiwari does not enjoy receiving hateful remarks from a fan)

मुंबई इंडियन्सचा ex-captain सध्या काय करतोय?

IPL मध्ये एके काळी 50 - 50 लाखांना विकला गेलेला कॅप्टन  सौरभ तिवारी -सध्या झारखंडच्या रणजी सामन्यात नशीब आजमावतो आहे. 

अधिक वाचाः सहाव्या दिवशीही लोकांना आहे रितेशच्या सिनेमाचे 'वेड'

इतका का चिडला सौरभ तिवारी?

झारखंडचा क्रिकेटर सौरभ - सध्या कौतुकामुळे नाही तर खरमरीत टीकेमुळे चर्चेत आला आहे. तो एका चाहत्यावर चिडला होता. फक्त चिडला नव्हता तर, त्याच्या रागाचा पारा इतका चढला होता की तो त्या चाहत्यामागे बॅट घेऊन धावला!

पण सौरभ बॅट घेऊन का धावला ?

कारण झालं असं होतं.. 
चाहता - सौरभभाई तुम्ही आता खेळायला जाणार आहात का? 
सौरभ - (काही रिप्लाय देत नाही.)
चाहता -  सौरभभाई तुम्ही आता खेळायला जाणारआहात का? 
सौरभ - (काही रिप्लाय देत नाही.)
चाहता - अबे सौरभ आता जाणार आहेस का? 
सौरभ - (उद्धटपणे बोलतो) तुला घरी जायचं आहे की नाही? 
चाहता - (त्याच्याकडे पाहात असतो) 
सौरभ - मॅच बघायला आला आहेस ना...  मॅचच बघ. नाहीतर तुझी दादागिरी इथेच उतरवून टाकेन. 
चाहता - आरामात घ्या .. शांत व्हा  
सौरभ - तू शांत हो, कळलं?
आणि मग सौरभ त्या चाहत्यावर बॅट  घेऊन धावला. 


http://

काप गेले आणि भोके राहिली

2008 मध्ये लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्समधून सौरभने IPLमध्ये पदार्पण केलेलं. 2010 च्या आयपीएलमध्ये मुंबईला अंतिम फेरीत नेण्यात मोलाची भूमिका त्यानेच बजावली होती. करियरच्या त्या सुवर्ण काळात सौरभने तीन अर्धशतकेही झळकावलेली. IPLसीझन 2011 च्या लिलावात त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतलं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी