VIDEO: दीपक चाहरने असा मारला सिक्स की रोहितने केला सॅल्यूट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 22, 2021 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Deepak chahar six: दीपक चाहरने शेवटी येत केवळ ८ बॉलमध्ये २१ धावा करत संघाला २० षटकांत १८४ धावांचा टप्पा गाठून दिला. 

rohit sharma
VIDEO: दीपक चाहरने असा मारला सिक्स की रोहितने केला सॅल्यूट 
थोडं पण कामाचं
  • भारतासाठी शेवटच्या ओव्हरची सुरूवात चांगली झाली.
  • यात चाहरने तीन बॉलमध्ये १० धावा काढल्या.
  • दीपक चाहला ड्रेसिंग रूममधूनही कौतुक मिळाले. कर्णधार रोहित शर्मा हा शॉट पाहून स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने दीपकला सॅल्यूट केला. 

मुंबई: भारताने(india) न्यूझीलंडला(new zealand) तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात(t-20 match) ७३ धावांनी हरवत तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीनस्वीप केले. भारताकडून रोहित शर्माने(rohit sharma) ५६ धावांची शानदार खेळी केली. यामुळे भारताला मोठे आव्हान ठेवण्यात यश मिळाले. मात्र रोहितच्या खेळीपेक्षा दीपक चाहरचा(deepak chahar) सिक्स आणि त्यावर रोहित शर्माने दिलेली प्रतिक्रिया यावर अधिक चर्चा झाली. खचाखच भरलेल्या ईडन गार्डनच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दीपकने आपल्या फलंदाजीचा करिश्मा दाखवला. पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताची सुरूवात शानदार झाली. मात्र सुरूवातीची जोडी फुटल्यानंतर नियमित अंतराने विकेट पडत गेल्या. see video; rohit sharma salute to deepak chahar six

भारताला फलंदाजीला खिंडार पडली होते. शेवटची ओव्हर सुरू होण्यास काही बॉल शिल्लक असेपर्यंत भारताने सात विकेट गमावल्या होत्या. क्रीझवर उभे होते दीपक चाहर आणि अक्षर पटेल. अॅडम मिल्नेला न्यूझीलंडची शेवटची ओव्हर टाकण्याची संधी मिळाली होती. 

दीपकचा शानदार शॉट

भारतासाठी शेवटच्या ओव्हरची सुरूवात चांगली झाली. यात चाहरने तीन बॉलमध्ये १० धावा काढल्या. मात्र चौथा ब्लॉकबस्टर शॉट हा चौथ्याबसला. बॉलवर मिल्नेने बॉल टाकला मात्र दीपक आधीच तयार होता. दीपकने बॅट फिरवली आणि टेनिसप्रमाणे फोरहँड स्मॅश लगावला आणि बॉलल लाँग ऑन क्षेत्ररक्षकाच्या वरती ९५ मीटर लांबीचा जोरदार सिक्स मारत पॅव्हेलियनमध्ये टाकला. 

हे पूर्णपणे आश्चर्यजनक होते. यामुळे चाहत्यांचा उत्साह अधिकच वाढला. दीपक चाहला ड्रेसिंग रूममधूनही कौतुक मिळाले. कर्णधार रोहित शर्मा हा शॉट पाहून स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने दीपकला सॅल्यूट केला. 

तिसऱ्या मॅचमध्ये तीन ओव्हरमध्ये नऊ धावा देत न्यूझीलंडच्या डेरिल मिचेल, मार्क चॅम्पमन आणि ग्लेन फिलिप्स या तिघांना बाद करणारा अक्षर पटेल मॅन ऑफ द मॅच झाला. संपूर्ण सीरिजमध्ये उत्तम कामगिरी करणारा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराचा मानकरी झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी