सेहवाग म्हणतो, तर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन खेळण्यास तयार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 13, 2021 | 14:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय संघाचे अनेक क्रिकेटर दुखापतग्रस्त झाले आहे. ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या आणि निर्णायक सामन्याआधीच टीम इंडियासमोर संकट उभे राहिले आहे. 

virendra sehwag
सेहवाग म्हणतो, तर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन खेळण्यास तयार 

थोडं पण कामाचं

  • वीरेंद्र सेहवागचे टीम इंडियासाठी मजेदार ट्वीट
  • सेहवाग म्हणाला, तर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन खेळण्यास तयार
  • टीम इंडियाचे अनेक शिलेदार दुखातपग्रस्त

मुंबई: ऑस्ट्रेलियामध्ये(australia) टीम इंडियासमोर(team india) मोठे आव्हान आहे ते खेळाडूंचे दुखापतग्रस्त(player injured) होणे. सध्या टीम इंडियाचे अनेक शिलेदार दुखापतग्रस्त आहेत. त्यातच भारताचा माजी क्रिकेटर वीरेंदेर सेहवागने(indian former cricketer virendra sehwag) चेष्टेच्या सुरात एक ट्वीट केले आहे. त्याने मंगळवारी म्हटले जर प्लेईंग XI पूर्ण झाले नाहीत तर तो ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार आहे.  भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंना दुखापती आहेत. ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्याआधीच त्यांच्यासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. अखेर प्लेईंग XIमध्ये कोणाला संधी द्यायची कारण मालिकेतील हा सामना निर्णायक आहे. 

४२ वर्षीय सेहवागने सहा खेळाडूंचा फोटो पोस्ट करत ट्वीटमध्ये लिहिले की, इतके सगळे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. ११ नाही झाले तर ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार आहे. क्वारंटाईनचे नंतर पाहू. यासोबतच त्याने बीसीसीआयलाही टॅग केले आहे. 

सेहवागने नेहमीच क्रिकेटबाबत मजेदार ट्वीट करत असतो. यावेळीही त्याने असेच काहीसे मजेदार ट्वीट केले आहे. 

चौथ्या कसोटीआधी जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारीही जखमी झाले असून ते ब्रिस्बेनमध्ये खेळू शकणार नाहीत. याआधी मोहम्मद शामी, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा हेही दुखापतीमध्ये मालिकेत खेळत नाही आहेत. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी १-१ अशी राहिली आहे. अॅडलेडमधील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली होती त्यानंतर मेलबर्नमदील दुसऱ्या कसोटीत भारताने जोरदार विजयी पुनरागमन केले. सिडनी येथे झालेली तिसरी मालिका अनिर्णीत ठेवण्यात भारताला यश मिळाले. त्यामुळे ब्रिस्बेन येथे होणारी ही कसोची निर्णायक असणार आहे. सध्या भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पॅटनिर्टी सुट्टीवर आहे. विराट आणि अनुष्का शर्माला नुकतीच कन्यारत्नाची प्राप्ती झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी