IND vs SA : भारतीय संघाची आज निवड, कुणाला मिळणार संधी, सिनिअर खेळाडूला आराम? हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारीची शक्यता

आयपीएलनंतर (IPL) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ भारत (India) दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी आज मुंबईमध्ये भारतीय संघाची (Indian team) निवड होणार आहे.

Selection of Indian team for the match against South Africa today
द. आफ्रिकाविरुद्धाच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड आज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दीपक चाहर, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळताना दिसणार नाहीत.
  • हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव कॅप्टनपदासाठी सर्वात आघाडीवर
  • 9 जून पासून सुरू होणाऱ्या या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची निवड

South Africa Tour of India : मुंबई :  आयपीएलनंतर (IPL) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ भारत (India) दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी आज मुंबईमध्ये भारतीय संघाची (Indian team) निवड होणार आहे.  दरम्यान यात 9 जून पासून सुरू होणाऱ्या या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असून आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.

दीपक चाहर, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळताना दिसणार नाहीत. तर  नियमित कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.

रोहित-विराटला आराम? हार्दिकवर जबाबदारी  

भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात पाच सामन्याची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताच्या दिग्गज खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता आहे. वर्कलोड मॅनेज करण्याच्या दृष्टीकोणातून बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितलं जात आहे.रोहित शर्माला विश्रांती दिल्यास टीम इंडियाचा या मालिकेत कॅप्टन कोण असेल हा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. तर घाबरु नका याचं उत्तरही आम्ही तुम्हाला देत आहोत.

आयपीएलमधील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या टीमचं नेतृत्त्व केलेल्या हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव कॅप्टनपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. हार्दिकच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं या आयपीएलमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गुजरातनं 14 पैकी 10 सामने जिंकत पहिल्या क्रमांकासह आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. हार्दिकनं आघाडीवर राहून टीमचं नेतृत्त्व केलं आहे. त्यानं 13 सामन्यात 41.30 च्या सरासरीनं 413 रन केले आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं 7.79 च्या इकोनॉमी रेटनं 4 विकेट्स घेत आपण बॉलिंग करण्यासही फिट असल्याचं दाखवून दिलं आहे. 

मोहसीन खान - उमरान मलिकला संधी 

हैदराबादचा वेगवान मारा उमरान मलिक आणि लखनौचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान यांना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 

IPL संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी-20 मालिका खेळणार

भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. 

भारत- दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक-         

सामना    तारिख ठिकाण
पहिला टी-20 सामना 9 जून  दिल्ली
दुसरा टी-20 सामना  12 जून  कटक
तिसरा टी-20 सामना  14 जून विशाखापट्टणम
चौथा टी-20 सामना   17 जून  राजकोट
पाचवा टी-20 सामना 19 जून बंगळुरू 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी