सेमी फायनलमध्ये पराभवानंतर पहिल्यांदा बोलले रवि शास्त्री, म्हटले टीमला नंबर चारवर... 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 16, 2019 | 22:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर रवि शास्त्री आणि टीम मॅनेजमेंटवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. टीमच्या पराभवानंतर पहिल्यांदा रवि शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ravi  shastri
रवी शास्त्री 
थोडं पण कामाचं
  • न्यूझीलंड विरूद्धच्या पराभवानंतर टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह 
  • शास्त्री यांनी नंबर चारमुळे आला टर्निंग पॉइंट 
  • नंबर चारवर टीमला सॉलीड फलंदाजी कमतरता भासली 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर रवि शास्त्री आणि टीम मॅनेजमेंटवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. टीमच्या पराभवानंतर पहिल्यांदा रवि शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ते म्हणाले, केवळ ३० मिनिट खराब खेळामुळे भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर गेला. शास्त्री यांनी मान्य केले की भारतीय संघ गेल्या दोन वर्षांपासून खूप चांगली कामगिरी करत आहे. केवळ अर्धा तासाच्या खेळाने टीम इंडियाचे स्वप्न भंग झाले आहे. 

शास्त्री यांनी एका न्यूज वेबसाइटशी बोलताना सांगितले की, न्यूझीलंडसोबत झालेल्या पराभवानंतर मी सर्व खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये बोलावले आणि सांगितले, तुम्ही आपली मान सदैव उंच ठेवा, तुम्हांला स्वतःवर गर्व व्हायला पाहिजे. यातील केवळ ३० मिनिट हे मिटवू शकत नाही की गेल्या काही वर्षात तुम्ही सर्वोत्कृष्ट संघ आहात. तुम्हांला ही गोष्ट माहिती आहे. एक टुर्नामेट, एक सिरीज, आणि ते ही ३० मिनिटांचा खेळ हे ठरवू शकत नाही. तुम्ही सन्मान अर्जित केला आहे. यात शंका नाही की आपल्याला दुःख झाले आहे आपण निराश आहो. पण अखेर गेल्या दोन वर्षात तुम्ही जे काही केले, त्यावर तुम्हांला गर्व असला पाहिजे. 

नंबर ४ ने खूप अंतर निर्माण केले...

शास्त्री यांनी स्वीकारले की, टीमला मिडल ऑर्डरमध्ये नंबर चारच्या फलंदाजीची उणीव भासली. शास्त्री यांच्या मते या स्पर्धेत नंबर चारच्या फलंदाज नसल्याने खूप अंतर निर्माण केले. 

त्यांनी सांगितले की, मध्यक्रमात आपल्या एक ठोस फलंदाजीची गरज आहे. पण आता भविष्यासाठी आपल्याला क्रमांक चारसाठी निर्णय घ्यावा लागणार आहे. ही अशी परिस्थिती आहे ती आम्हांला  खूप अडचणीची आहे. पण अद्याप आम्ही यावर उपाय योजना शोधू शकलो नाही. के एल राहुल क्रमांक चारवर फलंदाजी करत होता., पण शिखर धवन जखमी झाला. त्यानंतर विजय शंकरला नंबर चारवर फलंदाजीसाठी निवडण्यात आले. पण तो पण जखमी झाला. या गोष्टींवर आमचे नियंत्रण नसते. 

न्यूझीलंड विरूद्ध राहुलला नंबर चारवर पाठवून मयांक अग्रवाल ओपनिंगला जाऊ शकत होता का, हे विचारल्यावर रवि शास्त्री म्हणाले,  वास्तविक नाही, कारण हे अत्यंत घाईचे झाले असते. मयांक आमच्याकडे आला तेव्हा खूप कमी कालावधी होता. आमच्याकडे एक सामना अधिक असता तर आम्ही हे करू शकलो असतो. मयांकने लंडन येण्यासाठी उड्डाण केले तेव्हा राहुलने ओपनिंग करताना ६० धावा केल्या नंतर त्याने शतकही केले. मला माहिती तुमचा बोलण्याचा अर्थ काय आहे. जर आमच्याकडे आणखी एक सामना असता तर हा प्रयोग केला असता. 

वर्ल्ड कपनंतर आता टीम इंडियाचा वेस्ट इंडीज दौरा आहे. आता पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे की सेलेक्टर कोणत्या खेळाडूंना आराम देते आणि कोणाला संघात सामील करून घेते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी