Ravichandran Ashwin: टीम इंडियात वादळ आणणार अश्विनचे हे विधान?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 22, 2021 | 12:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ravichandran Ashwin controversial statement: टीम इंडियाचा वरिष्ठ ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनने नुकत्याच केलेल्या विधानावरून वाद चांगलाच रंगला आहे. रवीचंद्रन अश्विनने सांगितले की कसे दुखापतीच्या वेळेस त्याला एकट्याला सोडण्यात आले होते. तसेच रवी शास्त्रींबाबतही त्याने विधान केले आहे. 

r ashwin
Ravichandran Ashwin: टीम इंडियात वादळ आणणार अश्विनचे विधान 
थोडं पण कामाचं
  • रवीचंद्रन अश्विनच्या विधानावरून गदारोळ
  • दुखापतींच्या वेळेस आलेल्या समस्यांबाबत केले विधान

मुंबई: भारतीय क्रिकेट(indian cricket team) संघ सध्या द. आफ्रिकेत(india vs south africa) आहे. येथे काही दिवसांतच कसोटी सामना(test match) सुरू होत आहे. दरम्यान, ही कसोटी सुरूवातीपासूनच वादग्रस्त ठरत आहे. आफ्रिकेला रवाना होण्याआधी विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवले जाणे. त्यानंतर कोहलीने पत्रकार परिषद(press conference) घेऊन अनेक विधाने करणे. मालिका जवळ येत असताना या गोष्टी मागे पडत चालल्या होत्या. मात्र आता पुनहा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनच्या विधानाने वातावरण पुन्हा तापवले आहे. senior off spinner Ravichandran Ashwin controversial statement

टीम इंडियाचा मुख्य स्पिनर रवीचंद्रन अश्विनने एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते. अश्विनने  सांगितले की कशी त्याची दुखापत टीम मॅनेजमेंटने नजरअंदाज केली होती. तसेच त्याला एकट्याला सोडण्यात आले होते. माजी कोच रवी शास्त्रींकडून ऑस्ट्रेलियात कुलदीप यादवचे कौतुक केल्याबद्दलही त्याने काही सांगितले. 

क्रिकेट चाहत्यांमध्ये नवा वाद सुरू

अश्विनच्या विधानाने ड्रेसिंग रूममधील वातावरणावरही सवाल उपस्थित केले जात आहेत. येथे मॅच विनर्स प्लेयर्सचा फिटनेस आणि दुखापतींबाबत त्यांना एकट्याला सोडले जाते. या मुलाखतीने एक नवा वाद जन्माला घातला आहे. सोशल मीडियावर क्रिकेट ट्विटर अॅक्टिव्ह झाले असून आता चर्चेलाही सुरूवात झाली आहे. 

ट्विटरवर एका युजरने कमेंट केली की, रवीचंद्रन अश्विनच्या मुलाखतीला या पद्धतीने पाहिले पाहिजे की जिथे एक सीनियर क्रिकेटर रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी तयार केलेल्या खराब वातावरणाला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. तो यामुळे रिटायरमेंट घेणार होता यावरूनच समजते की तेथील वातावरण किती खराब होते. 

आणखी एका चाहत्याने लिहिले की, रवीचंद्रन अश्विनने आपला त्रास, दु:ख योग्य पद्धतीने वापरले आहे. रवी शास्त्रीच्या दिशेने योग्य निशाणा साधला. मात्र विराट कोहली अद्याप सिस्टीमचा भाग आहे. अश्विनने ६ महिन्यात व्हाईट बॉल क्रिकेट पाहिलेच नाही. 

अश्विनसाठी २०२१ वर्ष चांगले

रवीचंद्रन अश्वीनचे विधान या वेळेस आले आहे जेव्हा द. आफ्रिकेतीला  मालिका सुरू होणार आहे. अशातच टीम इंडिया अग्निपरीक्षेच्या दिशेने आली आहे. रवीचंद्रन अश्विनची गणना मॉडर्न टाईम ग्रेटमध्ये होते जो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या मॅच विनरपैकी एक आहे. २०२१ हे वर्ष रवीचंद्रन अश्विनसाठी चांगले गेले आहे. त्याने एका वर्षात कसोटीत ५० पेक्षा अधिक विकेट घेतल्या. तर व्हाईट बॉल इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही त्याचे पुनरागमन झाले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी