Unseen Video। साऱ्या स्वप्नांचा चक्काचूर..!, ड्रेसिंग रूममध्ये गुडघ्यावर बसून शादाब खानच्या अश्रूंचा बांध फुटला

PAK vs ZIM : पाकिस्तान क्रिकेट संघाचा उपकर्णधार शादाब खानचा एक न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर शादाब गुडघ्यावर बसून रडताना दिसला. पाकिस्तानचा एका धावेने पराभव झाला.

Shadab Khan was seen crying and crying after the loss against Zimbabwe - UNSEEN VIDEO
ड्रेसिंग रूममध्ये गुडघ्यावर बसून शादाब खान ढसाढसा रडला, Unseen Video...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • T20 विश्वचषक 2022 मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला.
  • या पराभवामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग अत्यंत खडतर झाला
  • पाकिस्तानच्या पराभवानंतर संघाचा उपकर्णधार शादाब खानचा एक न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे.

T20 World Cup 2022: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवाने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. त्यामुळे सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या चेहऱ्यावर हतबलता पाहायला मिळली. ICC T20 विश्वचषक 2022 मध्ये गुरुवारी झिम्बाब्वे विरुद्ध एक धावेने पराभव केल्याने पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील पत्ता कट झाला. भारताविरुद्धच्या निकराच्या सामन्यात पाकिस्तानचा प्रथम चार विकेट्सनी पराभव झाला आणि त्यानंतर झिम्बाब्वेने पाकिस्तानला एका धावेने पराभूत केले. या पराभवानंतर उपकर्णधार शादाब खानचा एक न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे. (Shadab Khan was seen crying and crying after the loss against Zimbabwe - UNSEEN VIDEO)

अधिक वाचा : PAKला आपल्याच माणसांनी दिली ही जखम, हा खेळाडू कसा बनला 22.5 कोटी लोकांसाठी व्हिलन?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by DBTV Sports (@dbtvsports)

या व्हिडिओमध्ये शादाब ड्रेसिंग रूमजवळ गुडघ्यावर बसून रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांना इमोशनल करणारा आहे. शादाब खानने या सामन्यात चांगली गोलंदाजी करत चार षटकात केवळ 23 धावा देत तीन बळी घेतले.

अधिक वाचा : AFG vs IRE: पावसाने धुतला गेला सामना, दोन्ही संघांना दिले पॉईंट

बाबर आझमचा हा सामना विजेता खेळाडू पुन्हा खलनायक ठरला, शेवटच्या षटकात चूक झाली
मात्र, फलंदाजीत तो काही करू शकला नाही आणि 14 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. पाकिस्तानने झिम्बाब्वेला 20 षटकांत 8 बाद 130 धावांवर रोखले, पण प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ 20 षटकांत 8 बाद 129 धावाच करू शकला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी