SMAT 2021: शाहरूख खानने शेवटच्या बॉलवर सिक्स मारत तामिळनाडूला बनवले चॅम्पियन, ४ चेंडूत ठोकले २२ रन्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 22, 2021 | 16:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tamil Nadu vs Karnataka, Final: तामिळनाडूने कर्नाटकला हरवले, शाहरूख खानने मिळवून दिला विजय.

shah rukh khan
SMAT 2021:शाहरूख खानने मारला सिक्स आणि जिंकली ट्रॉफी 
थोडं पण कामाचं
  • शाहरूख खानने सहाव्या स्थानावर फलंदाजी करत १५ चेंडूत नाबाद ३३ धावा ठोकल्या.
  • आपल्या या धडाकेबाज खेळीत त्याने ३ सिक्स आणि एक फोर ठोकला.
  • शेवटच्या बॉलवर तामिळनाडूला पाच धावांची गरज होती. अखेरच्या बॉलवर त्याने सिक्स ठोकत विजय मिळवून दिला. 

मुंबई: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत(Syed Mushtaq Ali Trophy Final)  तामिळनाडूने (tamilnadu)विजय मिळवला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये तामिळनाडूने कर्नाटकला(karnataka) ४ विकेटनी हरवले. कर्नाटकने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १५१ धावा केल्या आणि तामिळनाडूने शेवटच्या बॉलवर लक्ष्य पूर्ण केले. तामिळनाडूच्या विजयाचा हिरो शाहरूख खान बनला. ज्यांने शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत चॅम्पियन बनवले. शेवटच्या बॉलवर तामिळनाडूला पाच धावांची गरज होती. अखेरच्या बॉलवर त्याने सिक्स ठोकत विजय मिळवून दिला. shah rukh khan hit six and tamilnadu win SMAT 2021

शाहरूख खानने सहाव्या स्थानावर फलंदाजी करत १५ चेंडूत नाबाद ३३ धावा ठोकल्या. आपल्या या धडाकेबाज खेळीत त्याने ३ सिक्स आणि एक फोर ठोकला. इतक्या दबावाच्या क्षणमी शाहरूख खानने ज्या पद्धतीने खेळ केला तो वाखाणण्याजोगा होता. शाहरूख सोबत साई किशोरनेही तामिळनाडूच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या खेळाडूने अखेरच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर शानदार फोर ठोकला आणि सोबतच १२ धावा देत ३ विकेटही मिळवल्या. 

शेवटच्या ओव्हरमधील रोमहर्षक प्रवास

एक वेळ असा होता की कर्नाटक अगदी सोप्या पद्धतीन विजय मिळवू शकत होता मात्र शेवटच्या दोन ओव्हरमध्ये तामिळनाडूने आपला खेळ बदलला. १९व्या ओव्हरमध्ये शाहरूख खानने विद्याधर पाटीलच्या शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकत १४ धावा काढल्या. 

पहिला बॉल - प्रतीक  जैनच्या पहिल्या बॉलवर चौकार.

दुसरा बॉल - प्रतीक जैनने चांगले पुनरागमन केलेआणि साई किशोरला केवळ एक रन करता आला. 

तिसरा बॉल - प्रतीक जैनने तिसरा बॉल वाईड फेकला. यानंतर प्रतीक जैनने शाहरूख खानला केवळ एक रन करू दिला. आता तामिळनाडूला ३ बॉलमध्ये ९ धावांची गरज होती.\

चौथा बॉल - साई किशोरने एकच धाव काढली. आता तामिळनाडूने २ बॉलवरमध्ये ८ धावा करायच्या होत्या. आता शाहरूख स्ट्राईकवर होता. 

पाचवा बॉल - प्रतीक जैनने पुन्हा वाईड फेकला. तामिळनाडूला २ बॉलमध्ये ७ धावांची गरज. प्रतीक जैनने चांगला यॉर्कर फेकला आणि शाहरूख खानने लाँग ऑफवर शॉट खेळत दोन धावा काढल्या. 

सहावा बॉल - तामिळनाडूला विजयासाठी ५ धावा हव्या होत्या. प्रतीक जैनच्या शेवटच्या बॉलवर शाहरूख खानने डीप स्क्वेअर लेग बाऊंड्रीवर सिक्स मारला आणि तामिळनाडूला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी