shaheen afridi शाहीन आफ्रिदीने रोहित, राहुल आणि कोहलीची केली नक्कल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 12, 2021 | 18:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

pak cricketer mimicry शाहीन आफ्रिदीने सध्याच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहलीला बाद करत बॅकफूटवर ढकलले होते

shaheen afridi
shaheen: शाहीन आफ्रिदीने रोहित, राहुल आणि कोहलीची केली नक्कल 
थोडं पण कामाचं
  • भारताला पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये हरवले
  • शाहीन आफ्रिदीने भारताविरुद्ध ३ विकेट मिळवल्या.
  • पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. 

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup 2021)च्या ग्रुप स्टेजमध्ये(group stage) भारताचे अभियान संपले. टीम इंडियाने(team india) सुरूवातीचे २ सामने गमावल्यानंतर शेवटचे तीन सामने जरी जिंकले असले तरी खूप उशीर झाला होता. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सलामीवीर रोहित शर्मा(Rohit Sharma), लोकेश राहुल(KL Rahul), आणि विराट कोहलीला(Virat Kohli) आपली शिकार बनवली होती. शाहीनसाठी या तीनही फलंदाजांच्या विकेट एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हत्या. shaheen afridi make mimicry of rohit, virat and rahul

पाकिस्तानचा संघ जेव्हा स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरली तेव्हा बाऊंड्रीजवळ असलेले चाहते त्यांना चीअर अप करताना दिसले. सोशल मीडियावर सध्या स्कॉटलंड आणि पाकिस्तानच्या सामन्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात शाहीन भारतीय फलंदाज रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहलीा बाद करण्याची नक्कल करताना दिसत आहे. 

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की जेव्हा शाहीन बाऊंड्रीवर फिल्डिंग करत असतो तेव्हा चाहते तीनही भारतीय खेळाडूंची नावे घेतात. यानंतर आफ्रीदी आपल्या हाताचा बॅटप्रमाणे वापर कर त्यांची नक्कल करतो. दरम्यान, हा व्हिडिओ काहींना पसंत येत आहे तर काही जण यातून त्याला धडा घेण्यास सांगतात. एका फॅनने ट्वीट केले की, याला ताय दुसरा हसन अली बनायचे आहे का? हसन अलीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जो विकेट घेतल्यानंतर विचित्र पद्धतीने सेलिब्रेशनसाठी ओळखल जातो. पाकिस्तानने ग्रुप स्तरावर सर्व पाच सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. 

हसन अलीवर सोशल मीडियावर टीका

भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले होते, त्यावेळी भारतीय गोलदांज मोहम्मद शमीवर टीका होत होती. आज शमीच्या जागेवर पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली असून त्याच्या पत्नीलाही नेटकरी शिव्या घालत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हसन अलीकडून मॅथ्यू वेडचा झेल सुटला. वेडने पुढच्या तीन चेंडूत तीन षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत नेले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी