IND vs PAK: पाकिस्तानी कर्णधाराकडे आहे हे मोठे शस्त्र, कोहलीविरोधात वापरणार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 22, 2021 | 12:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माच्या सगळ्यात मोठ्या कमजोरीवर वार करून टीम इंडियाच खेळ खराब करू शकतो.

babar azam
IND vs PAK:भारताविरुद्ध पाक कर्णधाराकडे आहे हे मोठे शस्त्र  
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रीदी भारताविरुद्धच्या सामन्यात बाबसाठी मोठे हत्यार सिद्ध होऊ शकते. 
  • शाहीन आफ्रिदी वेगवान गोलंदाज आहे आणि सध्या तो जबरदस्त फॉर्मात आहे.
  • वॉर्मअप सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली.

मुंबई: टी-२०वर्ल्डकप २०२१मध्ये प्रत्येक क्रिकेट चाहत्याला २४ ऑक्टोबरच्या तारखेची प्रतीक्षा आहे. कारण या दिवशी रंगणार आहे भारत-पाकिस्तान जबरदस्त मुकाबला. टी-२० वर्ल्डकपमधील आतापर्यंतच्या सामन्यात पाकिस्तानला अद्याप भारताविरुद्ध विजय नशिबी आलेला नाही. पाकिस्तानच तोच संघ होता ज्याला फायनलमध्ये हरवून २००७चा वर्ल्डकप भारताने पटकावला होता. यावेळीही हा सामना हायवोल्टेज म्हणून पाहिला जात आहे.

मात्र पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माच्या सगळ्यात मोठ्या कमजोरीवर वार करून टीम इंडियाच खेळ खराब करू शकतो. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रीदी भारताविरुद्धच्या सामन्यात बाबसाठी मोठे हत्यार सिद्ध होऊ शकते. 

शाहीन आफ्रिदी वेगवान गोलंदाज आहे आणि सध्या तो जबरदस्त फॉर्मात आहे. वॉर्मअप सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. भारताचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नेहमीच डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध सहज दिसत नाहीत. हिटमॅन डावखुऱ्या वेगवान गोलंदाच्या हातून

आतापर्यंत टी-२० करिअरमध्ये १३ वेळा बाद झालेत तर विराटही ८ वेळा बाद झाला. यामुळेच बाबर आझम शाहीन आफ्रिदीला सुरूवातीपासूनच मोर्चावर आणेल. केवळ रोहित-विराटच नव्हे तर सूर्यकुमार यादवही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या हातून १० वेळा टी-२०मध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अशातच बाबर आफ्रिदीच्या मदतीने भारताच्या या कमजोरीचा फायदा उचलण्याचा नक्की प्रयत्न करणार.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वॉर्मअप सामन्यात रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने ४१ चेंडूच ६० धावांची खेळी केली होती. दरम्यान कोहलीच्या बॅटमधून सरावसामन्यात धावा निघाल्या नाहीत. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ ११ धावाच करता आल्या. ओव्हरऑल रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास कोहलीला पाकिस्तानच्या गोलंदाजीचा अॅटॅक खूप आवडतो. आतापर्यंत क्रिकेटच्या या सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सहावेळा सामना केला. यावेळी विराट कोहलीने चांगलीच धुलाई केली आणि २५४ धावा कुटल्या. विराट तीन वेळा नॉटआऊट राहिला. त्याने दोन अर्धशतकेही झळकावलीत. ७८ हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी